शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

...तर मेट्रो कामाला कायमची स्थगिती

By admin | Updated: April 12, 2017 02:34 IST

प्रस्तावित विकास आराखड्यात वांद्रे रेक्लेमेशन येथील एसपीए ब्लॉक -ए दफनभूमिसाठी आरक्षित ठेवा अन्यथा या ब्लॉकला कायमस्वरूपी स्थगिती देऊ, असा इशारा उच्च

मुंबई: प्रस्तावित विकास आराखड्यात वांद्रे रेक्लेमेशन येथील एसपीए ब्लॉक -ए दफनभूमिसाठी आरक्षित ठेवा अन्यथा या ब्लॉकला कायमस्वरूपी स्थगिती देऊ, असा इशारा उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिला. या ब्लॉकवर मेट्रो-७ चे कास्टिंग यार्ड आणि लेबर कॅम्पचे काम सुरू होते. मात्र, गेल्याच महिन्यात उच्च न्यायालयाने या कामास तात्पुरती स्थगिती दिली आहे. वांद्रे व खार परिसरात सुन्नी मुस्लिमांसाठी दफनभूमी बांधण्यासाठी प्रस्तावित विकास आराखड्यात भूखंड राखीव ठेवावा, यासाठी मोहम्मद अली कुरेशी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. गेल्या सुनावणीत न्यायालयाने प्रस्तावित विकास आराखड्यात दफनभूमिसाठी जागा राखीव ठेवणार की नाही, अशी विचारणा करत, पालिकेला प्रतिज्ञापत्राद्वारे तशी हमी देण्याचे निर्देश दिले होते. मंगळवारच्या सुनावणीत पालिकेने ही जागा आपल्या मालकीची नसून म्हाडाची असल्याचे सांगितले. ‘जमीन द्यायला नको, म्हणून ही टाळाटाळ सुरू आहे. याच अर्थ, ही जागा तुम्हाला दुसऱ्याला द्यायची आहे,’ असे म्हणत न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे वकील अर्श्रफ शेख यांना म्हाडाला प्रतिवादी करण्याचे निर्देश दिले.दफनभूमिसाठी जागा राखीव ठेवली नाहीत, तर ब्लॉक-एच्या जागेवर कायमची स्थगिती देऊ, असा इशाराही न्यायालयाने दिला. न्यायालयाने असे केल्यास पालिका किंवा म्हाडा ही जागा कोणालाही हस्तांतरित करू शकत नाही. याबाबत उच्च न्यायालयाने पालिकेला दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. (प्रतिनिधी)आमदारासह नगरसेवकाला धरले धारेवरभाजपाचे आमदार आशिष शेलार व वांद्र्याचे माजी नगरसवेक राजा रहेबर खान यांनी या याचिकेत मध्यस्थी अर्ज केला. मात्र, न्यायालयाने हे अर्ज याचिकेवरील सुनावणीस विलंब करण्यासाठी केले असल्याचे मत व्यक्त करत मध्यस्थीस नकार दिला. ‘तुम्ही (आशिष शेलार व राजा खान) एवढी वर्षे काय करत होता? एवढीच काळजी होती, तर यापूर्वीच याचिकेत मध्यस्थी अर्ज करायला हवा होता. तुम्हाला (आशिष शेलार) विधासनसभेत आणि दुसऱ्या मध्यस्थीला (राजा खान) पालिकेत या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्याची सोय आहे. त्यामुळे तुम्ही तेथे जा. आम्हाला तुमच्या मदतीची आवश्यकता नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने शेलार आणि खान यांना सुनावले.