शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

... तर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

By admin | Updated: March 7, 2016 03:38 IST

शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न येत्या आठवड्याभरात सोडवले नाहीत, तर ९ मार्चपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करू, अशा इशारा कोकण

मुंबई : शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न येत्या आठवड्याभरात सोडवले नाहीत, तर ९ मार्चपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करू, अशा इशारा कोकण विभागाचे शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी शासनाला दिला आहे. याबाबत मोते यांनी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे व शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांना निवेदन देऊन तातडीने प्रश्न सोडविण्याची मागणीही शिक्षक परिषदेने केली आहे.मोते यांनी सांगितले की, ‘राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी शिक्षकेतरांचा आकृतिबंध ठरविण्यासाठी शासनाने शासकीय कमिटी गठीत केली होती. समितीने ८ महिन्यांपूर्वी अहवाल सादर करूनही अंमलबजावणी होत नाही, शिवाय सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्याची मागणीही अद्याप प्रलंबित आहे.’ शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले की, मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊनही पदवीधर ग्रंथपालांच्या वेतनश्रेणीतील तफावत दूर झालेली नाही. याशिवाय विविध मागण्यांवर विधिमंडळात चर्चा झाल्या. तावडे यांनी शिक्षण विभागाला कार्यवाहीचे आदेशही दिले. मात्र, तत्वत: मान्यता मिळाल्यानंतरही आदेश काढण्यात दिरंगाई होत आहे, तर काही मागण्यांबाबत शिक्षण विभाग आदेशांची अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ करत आहे. परिणामी, शिक्षण विभागाने आणि तावडे यांनी शिक्षक परिषदेमार्फत पाठपुरावा केल्या जाणाऱ्या प्रलंबित मागण्या मार्गी लावल्या नाहीत, तर आंदोलन केले जाईल. (प्रतिनिधी)