शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...तर समृद्धी मार्गाला जमीन नाही - पवार

By admin | Updated: April 3, 2017 06:48 IST

मुंबई ते नागपूर या महामार्गाचा घाट कोणाच्या समृद्धीसाठी घातला जात आहे?

कल्याण : मुंबई ते नागपूर या महामार्गाचा घाट कोणाच्या समृद्धीसाठी घातला जात आहे? आधीच जिल्ह्यात दोन महामार्ग असताना हा महामार्ग कशासाठी? असे सवाल करीत, शेतकऱ्यांना त्याचा पुरेसा मोबदला दिला गेला नाही, तर एक इंचही जागा समृद्धी मार्गासाठी दिली जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी रविवारी दिला. यासाठी प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आंदोलन उभारेल, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली. कांबा गावात ठाणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यात ते बोलत होते. समृद्धी मार्गात बाधित होत असलेल्या शेतकऱ्यांच्या संघर्ष समितीने पवार यांची भेट घेतली. त्यांचे म्हणणे पवार यांनी समजून घेतले. या वेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, माजी मंत्री गणेश नाईक, माजी खासदार आनंद परांजपे, संजीव नाईक, आमदार ज्योती कलानी व अन्य मान्यवर उपस्थित होते.आधी समृद्धी मार्ग तयार केला जाईल. नंतर गावे वसवली जातील. मार्ग तयार करण्यास दहा वर्षे, गावे वसविण्यास दहा वर्षे लागतील. तोवर मोबदल्याच्या अपेक्षेतील शेतकरी खचून ‘वर’ गेलेला असेल. त्यामुळे आधी मोबदला द्या. नंतरच शेतकऱ्यांची जमीन प्रकल्पासाठी दिली जाईल, अशी भूमिका पवार यांनी जाहीर केली.शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मुद्दा मांडत आम्ही संघर्ष यात्रा काढली आहे. पण शेतकऱ्यांसाठी तोशिस सोसण्यास सरकार तयार नाही. देशातील राष्ट्रीयीकृत बँकेतून कर्ज घेणाऱ्या कर्जदारांचे दोन वर्षांत जवळपास १२५ लाख कोटींचे कर्ज माफ करण्यास हेच सरकार तयार आहे. पण केंद्रातील भाजपा सरकारला सामान्य माणसाच्या प्रश्नाविषयी जराही कणव, आस्था नसल्याची टीका त्यांनी केली. (प्रतिनिधी)>पीक विम्याचा मुद्दा संसदेत मांडणारभाजपा सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यावर लहान आकाराचे ३५ उद्योगधंदे बंद झाले. त्यामुळे ४० टक्के कामगारांची कामयस्वरूपी नोकरी गेली. त्यांच्या कुटुंबीयांना जबर किंमत मोजावी लागली, असे सांगून शरद पवार म्हणाले, ‘नोटा बदलून देतो’, असे सांगितल्यावर अनेकांनी बँकेत नोटा जमा केल्या. देशातील ३७० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ४० हजार कोटी जमा आहेत. महाराष्ट्राच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आठ हजार कोटी जमा आहेत. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ७८ कोटी जमा आहेत. त्याचे व्याज आणि विम्याची रक्कम यांचा भार बँकेवर पडतो आहे. हा पैसा अद्याप बदलून दिलेला नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतूनच शेतकऱ्यांच्या पीक योजनेसाठी कर्जपुरवठा होतो. त्यांच्या व्यवहाराचा रस्ताच नोटाबंदीने उद््ध्वस्त केल्याने शेतकऱ्यांच्या पीककर्ज योजनेलाच सुरुंग लागला आहे. हा मुद्दा मी संसदेत मांडणार आहे, असे त्यांनी सांगितले.>अहवालाच्या निर्णयावर टीका राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा अहवाल तयार करण्याचे काम राज्य सरकारने टाटा इन्स्टिट्यूटला दिले आहे. त्यांचा येथे काय संबंध? शेतकऱ्याच्या आत्महत्येचे कारणच समजून घ्यायचे असेल तर सरकारने गाव-पाड्यावर जाऊन त्या शेतकऱ्याची आई, बहीण, भाऊ, मुलगा, मुलगी, वडील यांच्याकडून हा प्रश्न समजून घ्यायला हवा, असे पवार म्हणाले.विरोधकांची एकजूट हवीलोकशाही दुभंगण्याचे काम भाजपा करीत असल्याने आता विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे आवाहन पवार यांनी केले.