शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

...तर जीवावर बेतले असते

By admin | Updated: June 22, 2016 01:55 IST

पारसिक बोगद्याच्या वरील भागात वसलेल्या बेकायदा उदयनगर लगतची संरक्षण भिंत कलल्याचे सकाळी सहा वाजता स्थानिकांच्या निदर्शनास आले.

पंकज रोडेकर/अनिकेत घमंडी/ कुमार बडदे,  ठाणे/मुंब्रापारसिक बोगद्याच्या वरील भागात वसलेल्या बेकायदा उदयनगर लगतची संरक्षण भिंत कलल्याचे सकाळी सहा वाजता स्थानिकांच्या निदर्शनास आले. मात्र मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरील वाहतूक अगोदरच गतप्राण झाली असताना या भिंतीच्या दुरुस्तीच्या कामाकरिता जलद मार्गावरील वाहतूक कशी थांबवायची, असा पेच निर्माण झाला. अखेर दुपारी दीड वाजता दुरुस्तीचे काम सुरु झाले. या दरम्यान ही भिंत रेल्वे मार्गावर पडली असती व त्याचवेळी वेगात एखादी लोकल तेथून जात असती तर शेकडो लोकांचे प्राण गेले असते व तेवढेच जखमी झाले असते, अशी धक्कादायक माहिती स्थानिक व अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’च्या निदर्शनास आणली.उदयनगर झोपडपट्टीतील नागरीकांसाठी असलेल्या शौचालयाचे नुतनीकरण सुरु असताना राबिट गोण्यामध्ये भरून ते बोगद्याच्या बाजूला उभारलेल्या संरक्षक भिंतीजवळ ठेवले होते. त्या वजनाने संरक्षक भिंत रेल्वे रु ळाच्या दिशेने कलली. पारसिक बोगद्याच्या दोन्ही बाजूस आणि वरच्या बाजूस वर्षानुवर्षे बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. ही बांधकामे रोखण्याकरिता तसेच दुर्घटना घडू नये याकरिता महापालिकेने ५० फूट उंचीवर १२ फूट रुंद संरक्षक भिंत आठ वर्षांपूर्वी बांधली. त्या भिंतीच्या मध्ये ठिकठिकाणी लोंखडी जाळ््या बसवल्या आहेत. वरील नागरी वस्तीतून सोडण्यात येणारे सांडपाणी सतत या भिंतीकडे येते. अनेकदा बोगद्यातील भिंतीवरून पाणी झिरपत असते. मंगळवारी पहाटे झालेल्या पावसाचे पाणी बोगद्यावरील जमिनीत झिरपल्याने सकाळी सहा वाजता बोगद्यावरील रस्ता खचला. त्यामुळे संरक्षक भिंत रेल्वे रु ळाच्या दिशेने कलल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. महापालिकेच्या ही बाब तत्काळ निर्दशनास आणून दिली गेली. मात्र हे काम करायचे तर त्याकरिता रेल्वे वाहतूक रोखणे गरजेचे होते. त्यातच मंगळवारी सकाळपासून मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरील वाहतूक रूळावरून घसरल्याने आणि दिव्यात जनतेच्या भावनांचा उद्रेक झाल्याने दुपारी दीड वाजेपर्यंत जलद मार्गावरील वाहतूक रोखण्याबाबत रेल्वेकडून प्रतिसाद लाभला नाही. त्यानंतर हे काम सुरू झाले. दरम्यानच्या काळात पावसाने विश्रांती घेतली म्हणून बरे. पावसाचा जोर कायम राहिला असता आणि ती कललेली भिंत धावत्या लोकलवर कोसळली असती तर काय याचा विचारच करता येत नाही. दुपारी दीडनंतर विशेष मेगाब्लॉकद्वारे भिंतीचा कललेला भाग काढून टाकला.