शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

...तर रुग्णालयांना टाळे ठोका - एकनाथ खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 01:28 IST

आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांना पत्र लिहूनही डॉक्टरच मिळत नसतील तर सरकारी दवाखान्यांना समारंभपूर्वक टाळे ठोका, या शब्दात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा विधानसभेत सरकारवर हल्ला चढविला.

मुंबई : आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांना पत्र लिहूनही डॉक्टरच मिळत नसतील तर सरकारी दवाखान्यांना समारंभपूर्वक टाळे ठोका, या शब्दात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा विधानसभेत सरकारवर हल्ला चढविला.जळगावमधील ग्रामीण रुग्णालयांचा बोजवारा उडाला असून रुग्णालये व आरोग्य केंद्रांमध्ये दोन-तीन वर्षे डॉक्टर नाहीत, टेक्निशियन नाहीत, अन्य पदभरती नाही, लोडशेडिंगमुळे शस्त्रक्रिया खोळंबल्या आहेत. सरकार लोकांच्या आरोग्याशी खेळत असून केवळ थातूरमातूर उपाययोजना करीत असल्याचा आरोप करतानाच यासंदर्भात आपण आरोग्य मंत्री सावंत यांना पत्र लिहून वस्तूस्थिती सांगितली. पण सहा महिने झाले तरी त्यांनी उत्तर दिले नसल्या टीकाही खडसे यांनी केली. खडसे यांनी मुंबईतील जे.जे.रुग्णालयातील असुविधांकडे लक्ष वेधत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनाही अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले. एका गरोदर महिलेला जे.जे.मध्ये व्हेंटिलेटर नसल्याने दाखल करून घेण्यात आले नाही. उपचाराअभावी त्या महिलेचा मृत्यू झाला, असे सांगतानाच याला जबाबदार कोण? असा सवाल खडसे यांनी केला.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसे