शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

...तर भारताचा इतिहास वेगळा असता

By admin | Updated: May 23, 2016 02:09 IST

पं. दीनदयाळ संघाचे प्रचारक म्हणून काम करत असताना जनसंघाच्या स्थापनेची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांचा खून झाला नसता तर ते आणखी २५ वर्षे कार्यरत राहिले असते़

पुणे : पं. दीनदयाळ संघाचे प्रचारक म्हणून काम करत असताना जनसंघाच्या स्थापनेची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांचा खून झाला नसता तर ते आणखी २५ वर्षे कार्यरत राहिले असते़ त्यातून भारताचा इतिहास वेगळा राहिला असता, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी व्यक्त केले़पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भारतीय विचार साधना प्रकाशन आणि नागपूर येथील विवस्वान प्रकाशनातर्फे डॉ. कुमार शास्त्री यांनी लिहिलेल्या ‘कारुण्यऋषी पं. दीनदयाल उपाध्याय’ या पुस्तकाचे प्रकाशन भांडारी यांच्या हस्ते रविवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. सुयश चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मोहन घैसास, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, किशोर शशितल आदी उपस्थित होते.भांडारी म्हणाले, ‘शोषित वंचितांची भाषा करणाऱ्यांनाच हा वर्र्ग हवा असतो. शोषित वर्गाचा उद्धार व्हावा, असे त्यांना कधीच वाटत नाही. कारण या वर्गावरच त्यांचे राजकारण सुरू असते. त्यामुळेच मोदी सरकारने जन-धन योजना राबवून समाजातील शेवटच्या व्यक्तीला न्याय द्यायचा प्रयत्न केला. दोन वर्षांत या वर्गातील ३२ कोटी नागरिकांनी शून्य रुपये असलेले खाते काढले. या खात्यांवर आता ६५ हजार कोटींच्या ठेवी आहेत. याचाच अर्थ पंडितजींनी सांगितलेल्या मार्गाने मोदी सरकार काम करत आहे.’ ६० - ६५ वर्षे देशात समाजवादी विचारांची अर्थव्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या अर्र्थव्यवस्थेमुळे १२५ कोटींच्या देशात आजही २६ टक्के नागरिक दारिद्र्यरेषेखाली आहेत. साम्यवादी आणि समाजवादी अर्थव्यवस्था आर्थिक दरी निर्माण करत आहे. पंडितजींनी त्यांच्या काळात साम्यवादी, समाजवादी आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था असताना आपला स्वत:चा वेगळा विचार मांडला होता. लोककल्याणकारी योजनांच्या नावाखाली अनुदाने आणि योजना देऊन दारिद्र्य निर्मूलन होत नसल्याचे पंडितजींचे मत होते. भारतीय जनता पक्षाला ज्या ज्या वेळी संधी मिळाली, त्या वेळी पक्षाने पंडितजींचे विचार व्यवहारात आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)