शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

..तर सरकारला ग्रहण लावणार

By admin | Updated: March 10, 2016 00:48 IST

गेल्या ५० वर्षांपासून धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. मागासलेल्या समाजाला ‘एसटी’मध्ये समावेश करून सवलती द्याव्यात, अशी शिफारस कालेलकर समितीने

जेजुरी : गेल्या ५० वर्षांपासून धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. मागासलेल्या समाजाला ‘एसटी’मध्ये (अनुसूचित जमाती) समावेश करून सवलती द्याव्यात, अशी शिफारस कालेलकर समितीने केंद्र सरकारला केली होती. मात्र, केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकार आरक्षणाबाबत वेळकाढूपणा करीत आहे. चालू अधिवेशनात आरक्षणाबाबत ठोस निर्णय न झाल्यास राज्यातील अवघा धनगर समाज एकवटून आंदोलनाद्वारे सरकारला ग्रहण लावल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा धनगर आरक्षण कृती समितीचे नेते आमदार प्रकाश शेंडगे यांनी जेजुरी येथे दिला आहे.धनगर समाजाला अनुसूचित जातींच्या आरक्षणातील सवलती मिळाव्यात, या मागणीसाठी आजपासून जेजुरी ते मुंबई, असे मोटरसायकल रॅलीचे आयोजन आरक्षण कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते जेजुरीगडावर खंडेरायाचा विधिवत पूजा-अभिषेक करूनत बेलभंडाऱ्याची उधळण करीत रॅलीला प्रारंभ करण्यात आला. या वेळी आरक्षण कृती समितीचे नेते पांडुरंग मिरगर, नाना देवकाते, भीमदेव बुरुंगुले, कल्याणी वाघमोडे, माणिकराव सोलनकर, आबा मुरारी, राधाकृष्ण पाटील, बबन मदने, रमेश लेंडे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेंडगे म्हणाले, धनगर समाजबांधवांचे आराध्यदैवत खंडेराया असल्याने देवाचे आशीर्वाद घेऊन बेलभंडारा उधळून रॅलीची सुरुवात केली आहे. खोपोली येथील शिंगरोबा यांचे दर्शन घेऊन गुरुवारी (दि. १०) आझाद मैदान मुंबई येथे हजारो बांधवांच्या उपस्थितीत आरक्षण मागणीसाठी बेलभंडारा उधळणार आहोत. २०१४च्या निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती येथे आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सरकार स्थापन होऊ द्या; पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीत आरक्षण देऊ, असे आश्वासन दिले होते. ४ जानेवारी २०१५ रोजी नागपूर येथे झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही समाजाला ‘अच्छे दिन’चे प्रलोभन दाखविले होते.