शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

...मग शाळेत जा!

By admin | Updated: June 3, 2017 03:40 IST

शेतकरी संपावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. कर्जमाफी, आरक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकरी संपावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. कर्जमाफी, आरक्षण वगैरे प्रत्येक मुद्द्यावर अभ्यास करू, या सरकारी आश्वासनाचाही त्यांनी समाचार घेतला. प्रत्येक विषयावर फक्त अभ्यास करायचा असेल तर त्यांनी शाळेत जायला पाहिजे, सरकार चालवू नये, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. भाजपावर हल्लाबोल करताना ते म्हणाले, शेतकरी कर्जमाफी, बाळासाहेबांचे स्मारक अशी वाट्टेल ती आश्वासने देऊन भाजपा सत्तेवर आली. पण राज्याच्या तिजोरीत पैसेच नसताना ही आश्वासने पूर्ण कशी करणार, असा सवाल करतानाच भाजपाने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला. जुन्या घोषणांना नवीन नाव देण्यासाठी भाजपाकडे एक समिती असल्याची टीकाही त्यांनी केली.शेतकरी संपाला तुमचा पाठिंबा आहे का? असे विचारले असतामाझा पाठिंबा शेतकऱ्यांच्या भावनांना आहे, असे सांगून ते म्हणाले,राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे निघाले, पण पुढे काय झाले? संप आणि बंद करून काय हाती पडणार हे महत्त्वाचे आहे. जे गिरणी कामगारांचे झाले ते शेतकऱ्यांचे व्हायला नको. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे असून, तोपर्यंत त्यांच्या मनातील राग कायम राहणे गरजेचे आहे.शिवसेनेवरही  साधला निशाणाराज्य सरकारवर टीकेची झोड उठवणाऱ्या राज यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला. शिवसेना सत्तेत फक्त अंडी उबवत बसली असून, त्यांना भूमिकाच घेता येत नाही. त्यांचे मंत्री खुर्ची सांभाळण्यात व्यस्त आहेत, असे ते म्हणाले.