शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

...तर आर्थिक संकट अटळ

By admin | Updated: November 2, 2016 01:20 IST

गुंतवणूक वाढल्यानंतर अर्थव्यवस्था ‘पिकअप’ घेते. हा अनुकूल निर्णय झाल्यास अर्थव्यवस्था चांगल्या दिशेने जाईल.

बारामती : गुंतवणूक वाढल्यानंतर अर्थव्यवस्था ‘पिकअप’ घेते. हा अनुकूल निर्णय झाल्यास अर्थव्यवस्था चांगल्या दिशेने जाईल. मात्र, तसे न करता केवळ कठोर नियम करण्याचे सूत्र स्वीकारल्यास मोठे आर्थिक संकट निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असे भाकीत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. दि बारामती मर्चंट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात दिवाळी पाडव्यानिमित्त व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते म्हणाले, की पंतप्रधानांनी दोन वर्षांत अर्थव्यवस्था शिस्तीच्या चौकटीत आणणार असल्याचे सांगितले आहे. सध्या दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. पुढील काळात गुंतवणूक वाढविणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. येत्या सहा महिन्यांत अमेरिकेबरोबरच सरकारच्या धोरणाचे परिणाम दिसतील. ऊस उत्पादक, व्यापारी, कारखाना या तिघांना ही धोरणे घातक आहेत, असे पवार यांनी सांगितले. दि बारामती मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल वाडीकर यांनी प्रास्तविक केले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, नगराध्यक्ष योगेश जगताप, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर करंदीकर, बारामती अ‍ॅग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित पवार, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर कदम, पोपटराव तुपे, सदाशिव सातव, सचिन सातव, सुभाष ढोले, इम्तियाज शिकीलकर, किशोर शहा, जवाहर वाघोलीकर, अरविंद जगताप, जयकुमार वडुजकर, वैभव शिंदे, विशाल वडुजकर, प्रमोद खटावकर आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)>यंदा चांगल्या पावसामुळे उसाच्या लागवडीत वाढ होईल. त्यामुळे पुढील वर्षी ऊस गळीताचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. साखरेबाबत केंद्र शासनाचे निर्णय अयोग्य आहेत. साखर निर्यातीवर २० टक्के कर बसविला. साठा न करता साखर विक्री केलीच पाहिजे. विक्री न केल्यास कारवाई केली जाणार आहे. साखरेच्या साठ्यावर अधिक मर्यादा आणा, लवकर साखर विका, त्यातुन किंमत कशी देणार, हा माझ्यासारख्याला पडलेला प्रश्न आहे.