शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

...तेव्हा डॉक्टरनेच घ्यावे ‘सेकण्ड ओपिनियन’

By admin | Updated: July 20, 2016 02:23 IST

डॉक्टरकडे गेल्यावर रुग्णाच्या तपासण्या झाल्यावर औषधोपचार सुरु केले जातात.

मुंबई : डॉक्टरकडे गेल्यावर रुग्णाच्या तपासण्या झाल्यावर औषधोपचार सुरु केले जातात. पण, काहीवेळा आजाराचे योग्य निदान झालेले नसते. त्यामुळे औषधे घेऊनही आजार बरा होत नाही. अशावेळी डॉक्टरच्याही लक्षात येते आजाराचे निदान होत नाही. अशावेळी रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना अंधारात न ठेवता, डॉक्टरांनी स्वत: त्यांना योग्य वाटणाऱ्या डॉक्टरकडून सेकण्ड ओपिनियन घ्यावे, असा सूर ‘सर्वप्रथम अपाय नको’ या चर्चासत्रात उमटला.परळच्या केईएम रुग्णालयातील ‘बायोएथिक्स युनिट’तर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वंध्यत्व डॉ. अनिरुद्ध मालपानी लिखित ‘पेशंट सेफ्टी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख रुग्णालये संचालक डॉ. अविनाश सुपे उपस्थित होते. यानंतर ‘सर्वप्रथम अपाय नको’ याविषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात डॉ. फारूख उदवाडिया, डॉ.सुनिल पांड्ये, डॉ. यशवंत आमडेकर आणि डॉ. उर्मिला थत्ते सहभागी झाले असून डॉ. मालपानी यांनी सत्रसंचालकाची भूमिका बजावली. या चर्चासत्रात डॉक्टर आणि रुग्ण यांचे नातेसंबंध, डॉक्टरांचे प्रश्न, डॉक्टरांच्या जबाबदाऱ्या अशा विषयांवर चर्चा करण्यात आली. रुग्ण बरा होणे, त्याला उत्तम उपचार मिळणे हे महत्त्वाचे असते. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांचा विचार करुनच उपचारपद्धती निवडली पाहिजे. एकाच रुग्णाला तीन ते चार अथवा अधिक डॉक्टर तपासत असतील तर या सर्वांमध्ये संवाद पाहिजे. त्या रुग्णाला दिलेली औषधे कागदावर लिहणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. कोणतीही चूक झाली, काही अंदाज चुकले तर त्यासाठी मी स्वत: जवाबदार आहे, असे प्रत्येक डॉक्टरला वाटले पाहिजे. माझ्याकडून चूक झाली तर पुढच्यावेळी तो रुग्ण माझ्याकडे येणार नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे असे मत डॉ. आमडेकर यांनी सांगितले. डॉ. थत्ते यांनी डॉक्टरांनी ‘मेडिकल एरर’ रिपोर्ट केले पाहिजेत असे सांगितले. वैद्यकीय क्षेत्रात संशोधन पब्लिश देखील झाले पाहिजे. त्यामुळे अन्य डॉक्टरांना शिकता येईल. डॉक्टरांनी रुग्णांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली पाहिजे. त्यामुळे रुग्णाचा डॉक्टरांवर विश्वास बसतो. त्यामुळे रुग्णासाठी उपचार सुकर होतात असे डॉ. मालपानी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)>डॉक्टर रुग्णांमुळे आहेत-पांड्ये आपण रुग्णांमुळे आहोत हे सर्व डॉक्टरांनी लक्षात ठेवले पाहिजे. रुग्णांच्या हिताचा विचार सर्वप्रथम व्हायला पाहिजे. अनेक प्रश्न, समस्या आहेत. पण, त्या समस्यांचे पूर्णपणे निराकरण करणे शक्य नसले तरीही त्यातून मार्ग काढला पाहिजे. रुग्णांना याचा कमीत कमी त्रास कसा होईल, याचा विचार केला पाहिजे. >तीन ‘सी’ महत्त्वाचे - उदवाडियाकेअर, कम्पॅशन आणि कम्युनिकेशन हे तीन ‘सी’ डॉक्टरसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे उदवाडिया यांनी सांगितले. आजार एकच असला तरीही रुग्णानुसार बदलतो. हे डॉक्टरने लक्षात ठेवले पाहिजे. आजार ओळखून उपचार केले पाहिजेत. प्रत्येक डॉक्टरने स्वत:च कोणते उपचार केले, औषधे का दिली हे लिहून ठेवणे आवश्यक आहे.