शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

...तर अधिकाऱ्यांवर थेट कारवाई

By admin | Updated: July 16, 2017 00:44 IST

नागरिकांना वेळेत सेवा मिळण्यासाठी राज्य शासनाने सेवा हक्क कायदा केला आहे. तरी नागरिकांना वेळेत सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. अशा कामात दिरंगाई

- लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागरिकांना वेळेत सेवा मिळण्यासाठी राज्य शासनाने सेवा हक्क कायदा केला आहे. तरी नागरिकांना वेळेत सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. अशा कामात दिरंगाई होत असेल तर नागरिकांनी तक्रार करावी. तथापि, कुणी तक्रार केली नाही, तरी आयोग अशा प्रकरणात स्वत:हून पुढाकार घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करू शकते, असा इशारा राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी दिला.विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी सेवा हक्क कायद्याबाबत विभागीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. स्वाधीन क्षत्रिय यांनी सांगितले की, सेवा हक्क कायदा हा ५० सेवांपासून सुरू झाला. आता तब्बल ४०७ सेवा या अंतर्गत येतात. असे असले तरी या कायद्याबाबत अजूनही लोकांमध्ये जनजागृती नाही. ती करण्याची गरज आहे.तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतूमध्ये विविध प्रमाणपत्रासाठी ठरावीक कालावधी निश्चित करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी योग्य व्हावी, यासाठी डॅशबोर्ड असावा, अशा अधिकाऱ्यांच्या सूचना आल्या आहेत. त्यादृष्टीने प्रयत्न केले जातील. तसेच एखादा अर्जाची नेमकी स्थिती काय आहे. याबाबत प्रत्येक संबंधितांना अलर्ट केले जाईल. जेणेकरून ते अर्ज तातडीने निकाली निघेल. याची माहिती संबधित अधिकाऱ्यांपासून जिल्हाधिकाऱ्यांनाही दिली जाईल. ही अलर्ट प्रणाली येत्या १५ आॅगस्टपासून अमलात येणार असल्याचे क्षत्रिय यांनी सांगितले. ‘डिजिटल लॉकर’ उघडणार काही प्रमाणपत्रे ही वारंवार उपयोगात येतात. त्यामुळे ती वारंवार काढली जातात. प्रत्येक वेळी नव्याने अर्ज करून प्रत्येक कागदपत्र त्यासोबत जोडावे लागते. अशा प्रमाणपत्रांसाठी आता डिजिटल लॉकर सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती स्वाधीन क्षत्रिय यांनी दिली.