ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. १६ - शहरातील बळीराम पेठेतील साईबाबा मंदिराच्या खिडकीचे गज कापून तसेच दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील पंधरा हजार रुपयांची रोकड लांबविण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. ५ मे २०१६ रोजी याच मंदिरात चोरी झाली होती, तेव्हा चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्याने आठ तासाच्या आतच त्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले होते. आताही एक चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या मंदिरात आतापर्यंतची ही तिसरी चोरी आहे.४५ मिनिटे चोरटा मंदिरातएक चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तोंडाला पांढऱ्या रंगाची पिशवी गुंडाळल्यामुळे त्याचा चेहरा दिसत नाही.एक वाजून १५ मिनिटांनी त्याने आतमध्ये प्रवेश केला b दोन वाजता तो बाहेर पडला. ४५ मिनिटात त्याने हात साफ केला आहे. या वेळी पहिल्या हॉलमधून त्याने प्रवेश केला आहे.
जळगावच्या साईबाबा मंदिरात तिसऱ्यांदा चोरी
By admin | Updated: August 16, 2016 15:03 IST