शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात वाढतोय ‘झिका’चा धोका! १२८ रुग्णांची नोंद, सतर्कतेचे आरोग्य विभागाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 10:23 IST

या आजारात रुग्णाला उपचारासाठी भरती व्हावे लागत नाही. तसेच, मृत्यूचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे.

मुंबई - राज्यात गेल्या काही दिवसांपासून झिका आजाराचे रुग्ण वाढत असून, आतापर्यंत १२८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत अजून एकही रुग्ण सापडलेला नसला, तरी सार्वजनिक आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. झिका हा डेंग्यू आणि चिकुनगुनियासारख्या एडिस डासांमुळे पसरणारा आजार आहे. हा आजार प्राणघातक नसला, तरी ‘झिका’ची लागण झालेल्या गर्भवती महिलांना त्याचा अधिक धोका असतो. त्यामुळे नवजात अर्भकाच्या मेंदूचा आकार लहान होऊ शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. 

झिका आजाराचे पुणे महापालिका हद्दीत ९९, पुणे ग्रामीणमध्ये ९, पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीत ६, अहमदनगर (संगमनेर) मध्ये ११, सांगली (मिरज) मध्ये १, कोल्हापूरमध्ये १, सोलापूरमध्ये १  या ठिकाणी रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना सर्व राज्यांसाठी जारी केल्या आहेत. या आजारामुळे कुणीही घाबरून जाण्याची गरज नाही. 

या आजारात रुग्णाला उपचारासाठी भरती व्हावे लागत नाही. तसेच, मृत्यूचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. ताप आल्यास त्वरित सरकारी रुग्णालयात दाखवावे. अंगावर ताप काढू नये. कोणत्याही परिस्थितीत डासांची पोषक वातावरण तयार करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

उपचार काय?रुग्णाने पुरेशी विश्रांती घ्यावी.निर्जलीकरण टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन करावे.ऑस्पिरीन अथवा एन.एस.ए.आय.डी. प्रकारातील औषधांचा वापर करू नये.

झिकाचे निदान कुठे होते? राष्ट्रीय रोगनिदान संस्था, नवी दिल्ली तसेच राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे तसेच व्हीआरडीएल प्रयोगशाळा नागपूर, मिरज, सोलापूर, अकोला व छत्रपती संभाजीनगर येथे ‘झिका’च्या निदानाची सुविधा मोफत उपलब्ध आहे.

प्रसार कशामुळे होतो? 

लैंगिक संपर्काद्वारे. गर्भधारणेदरम्यान. आईपासून गर्भापर्यंत संक्रमित होतो.रक्त आणि रक्त उत्पादनांचे संक्रमण.अवयव प्रत्यारोपणाद्वारे. 

टॅग्स :Zika Virusझिका वायरस