शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पोलीस होण्याचं स्वप्न अर्धवट राहिलं; धावता धावता तिने घेतला जगाचा निरोप

By रवी दामोदर | Updated: August 24, 2022 22:38 IST

धोतडी येथील रोशनी वानखडे ही रनिंगचा सराव करण्यासाठी शहरातील वसंत देसाई क्रीडा संकुलच्या मैदानावर आली होती

अकोला: शहरातील स्व. वसंत देसाई क्रीडा संकुलवर ग्रामीण भागातील अनेक युवक पोलीस भरती तसेच आर्मी भरतीचा सराव करण्यासाठी रनिंगसाठी येतात. अशाच प्रकारे पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून धोतर्डी येथून आलेल्या एका मुलीचा धावताना चक्कर येऊन खाली कोसळून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.

धोतडी येथील रोशनी वानखडे ही रनिंगचा सराव करण्यासाठी शहरातील वसंत देसाई क्रीडा संकुलच्या मैदानावर आली होती. सायंकाळच्या सुमारास सराव करताना ती चक्कर आल्याने खाली कोसळली. ही बाब तिच्या मित्र-मैत्रिणींच्या लक्षात येताच त्यांनी तिला तत्काळ शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यासाठी हलविले. तिथे मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या मागे आई एक भाऊ व एक बहीण असा आप्त परिवार आहे गत काही दिवसांपासून ती अकोला शहरातील रहिवासी असलेल्या मोठ्या बहिणीकडे राहत होती व तेथूनच ते पोलीस भरतीच्या तयारीसाठी वसंत देसाई स्टेडियमवर सरावा करिता जात होती, अशी माहिती आहे.

दोन्ही भावंडे करीत होते सरावरोशनी व तिचा भाऊ हे दोन्ही भावंडे पोलीस भरतीच्या प्रक्रियेसाठी सराव करीत होते दररोज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास वसंत देसाई स्टेडियम वर जाऊन रनिंगची प्रॅक्टिस करीत होते; मात्र आज रोशनी साडेचार वाजताच निघून गेली होती.

वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूगट आठ ते दहा वर्षांपूर्वी रोशनीचे वडील अनिल वानखडे यांना सुद्धा शेतात हृदयविकाराच्या झटका आल्याने मृत्यू झाला होता. आता रोशनीचा आकस्मिक मृत्यू झाल्याने गावात सर्वत्र हळहळ होत आहे.