शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रभागेच्या पात्रात थाटली दुकाने

By admin | Updated: June 27, 2016 04:36 IST

चंद्रभागेच्या पात्रात दुचाकी धुऊ नयेत, दशक्रिया विधी करू नये, दुकाने थाटू नयेत असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असतानाही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष

सचिन कांबळे,

पंढरपूर- चंद्रभागेच्या पात्रात दुचाकी धुऊ नयेत, दशक्रिया विधी करू नये, दुकाने थाटू नयेत असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असतानाही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने नदीपात्रात राजरोसपणे या घटना घडत आहेत. त्यामुळे चंद्रभागेला प्रदूषणाचा विळखा घट्ट होत असतानाच काही जणांनी नदीपात्रात बेकायदा दुकाने थाटली आहेत़विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेले वारकरी मोठ्या श्रद्धेने चंद्रभागेत स्नान करतात. नदीतील पाणी तीर्थ म्हणून आपल्या गावी घेऊन जातात; मात्र वारीच्या कालावधीत चंद्रभागेच्या वाळवंटात व नदीपात्राच्या परिसरात घाणीचे साम्राज तयार होते. यामुळे भाविकांचे व शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असते. यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने चंद्रभागा नदीचे प्रदूषण होऊ नये व वाळवंटात घाण होऊ नये, यासाठी काही सूचना दिल्या होत्या. त्यानुसार चंद्रभागेच्या नदीपात्रात वाहने, जनावरे धुण्यास मनाई आहे. त्याचबरोबर हार व फुलांचे साहित्य टाकण्यासाठी कलश ठेवण्यात आले आहेत. तसेच वाळवंटाच्या पात्रात दशक्रिया विधी करण्यास, केस कापण्यास, हॉटेल टाकण्यास, वाहन घेऊन जाण्यास मनाई आहे. वाहने वाळवंटात व पात्रात जाऊ नयेत यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. तरीही अनेक वाहनधारक मार्ग शोधत दुचाकी वाहने वाळवंटात घेऊन जातात. चंद्रभागेच्या पात्रातील वाळूउपसाही गाढवांच्या साहाय्याने रोज केला जातो. वाळवंटात कचऱ्याचे ढीग साठले आहेत. या सर्व गोष्टींकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने वारकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नियमांची राजरोस पायमल्लीचंद्रभागेला प्रदूषणाचा विळखा पडलेला असतानाच नदीपात्रात दुकाने थाटण्यात आली आहेत. वाहने वाळवंटात व नदीच्या पात्रात जाऊ नयेत यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. तरीही अनेक जण वाहने वाळवंटात घेऊन जातात. वाळूउपसाही केला जातो. नदीच्या पात्रात कचऱ्याचे ढीग साचले आहेत.