शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

... म्हणजे शेपूट घातले नाही!

By admin | Updated: January 24, 2015 01:37 IST

माझा महाराष्ट्र अस्थिर होऊ नये याकरिता सत्तेत सहभागी होण्याची तडजोड स्वीकारली म्हणजे शिवसेनेने शेपूट घातलेली नाही. आम्ही सरकारजमा झालेलो नाही.

उद्धव ठाकरेंचा इशारा : भाजपा सरकारची केली कानउघाडणीमुंबई : माझा महाराष्ट्र अस्थिर होऊ नये याकरिता सत्तेत सहभागी होण्याची तडजोड स्वीकारली म्हणजे शिवसेनेने शेपूट घातलेली नाही. आम्ही सरकारजमा झालेलो नाही. राज्यातील हे भाजपाचे सरकार जनतेशी अन्यायाने वागत असेल तर त्या सरकारवर पहिला वार शिवसेनाच करील, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिला. देशातील भाजपा सरकारला संपूर्ण बहुमत असतानाही काश्मीरबाबतचे ३७० वे कलम रद्द का होत नाही आणि समान नागरी कायद्याची अंमलबजावणी का केली जात नाही, असा सवाल करीत ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केले.शिवसेनाप्रमुख यांच्या जयंतीनिमित्त माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित केलेल्या मेळाव्यात ठाकरे बोलत होते. त्यानंतर दादर शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकापाशी बसवलेल्या प्रेरणा ज्योतीचे प्रज्वलन ठाकरे यांनी केले. ठाकरे म्हणाले की, आता आपण कुणाच्या मेहरबानीवर नाही. कुठल्याही लाटेवर तरंगणारे ओंडके नाही. हिंदूंना दहा बालकांना जन्म देण्याचा उपदेश करणाऱ्या भाजपा नेत्यांना या मुलांना पोसणार कोण, असा सवाल करून ते म्हणाले की, केवळ मते टाकायला मेंढरांची पैदास नको. दुनिया हलवणारा एकच मुलगा पुरेसा आहे. काश्मीरमधील पंडितांची घरवापसी का झाली नाही? वाजपेयी सरकारची परिस्थिती वेगळी होती. मात्र आता बहुमताचे सरकार असताना ३७०वे कलम, समान नागरी कायदा याबाबत भूमिका का घेतली जात नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न का दिले नाही, असा सवाल त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)बाळासाहेबांच्या स्मारकाकरिता उंबरठे झिजवणार नाहीशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक म्हणजे त्यांचा केवळ पुतळा नव्हे. माझ्या कल्पनेतील स्मारक उभे करण्याकरिता मी कुणाचे उंबरठे झिजवणार नाही किंवा वाडगा घेऊन फिरणार नाही. दिमाखाने व शानदारपणे स्मारक उभे राहणार असेल तर होऊ द्या, असे उद्गार ठाकरे यांनी काढले.फर्लो की फिरलो..?पूर्वी पाठराखण केलेल्या संजय दत्तला भाजपा सत्तेत मिळत असलेला हा फर्लो आहे की फिरलो आणि परत आत गेलो आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली. देशद्रोहाचा खटला असलेला आत-बाहेर कसा, असे ते म्हणाले.