शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दारी आलेल्या भाजीला ठाणेकरांचा तुडुंब प्रतिसाद

By admin | Updated: August 4, 2016 02:50 IST

‘शॉप फॉर चेंज’ या संस्थेने ठाण्यात आयोजित केलेल्या शेतकरी ते ग्राहक उपक्रमास ठाणेकरांनी भरघोस प्रतिसाद दिला.

ठाणे : ग्राहकांना थेट दारापर्यंत भाजीपाला मिळावा यासाठी ‘शॉप फॉर चेंज’ या संस्थेने ठाण्यात आयोजित केलेल्या शेतकरी ते ग्राहक उपक्रमास ठाणेकरांनी भरघोस प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांचा माल थेट आपल्या दारापर्यंत मिळत असल्याने एकीकडे ठाणेकर आनंदीत झाले होते, तर आपल्या शेतातील भाजीपाला हातोहात विकला जात असल्याने शेतकरीही सुखावले होते. ठाणे, डोंबिवली, दादर येथे प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात आला. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता ठाण्यातील विष्णूनगर येथे बुधवारी मनसेच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला गेला. नारायणगाव परिसरातील शेतकऱ्यांचा चांगल्या दर्जाचा रास्त दरातील भाजीपाला ठाणेकरांच्या दारात आला. जवळपास दीड टन भाजीपाला आणला होता. आता दर सोमवारी, बुधवारी आणि शनिवारी ४.३० ते ७.३० यावेळेत दादर, डोंबिवली, ठाणे येथे हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे संस्थेचे समीर आठवले यांनी सांगितले. दलालांच्या माध्यमातून ज्यावेळी भाजीपाला विकला जात असे त्यावेळी आम्हाला तुटपुंजी मिळकत मिळत होती. परंतु या उपक्रमामुळे ३० टक्के फायदा होतो. आमच्या शेतातील माल थेट ग्राहकाच्या दारात जातो, ही संकल्पनाच खूप समाधान देणारी आहे. आम्ही थेट शहरात विक्रीसाठी आलो तर आम्हाला कोण दाद देणार? त्यामुळे संस्थेचा मोलाचा आधार मिळतो आहे. हा उपक्रम सातत्याने चालू रहावा, अशी आमची अपेक्षा आहे. ग्राहकांना ज्या भाज्या आवडतात त्याच आम्ही आणतो. कोणीही घासाघीस करीत नाही. कारण किरकोळ बाजारातून घेत असलेल्या दरापेक्षा ५० टक्के कमी दरानेच भाजीपाला आम्ही विकतो. त्यामुळे यात ग्राहकांचाच फायदा आहे. भाजीपाला विकताना कोणतीही अडचण आम्हाला जाणवत नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले.याआधी ठाण्यात प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम राबविला होता. त्यावेळी जवळपास ८०० किलो भाजीपाला विकला गेला होता. परंतु आताही ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. - समीर आठवले, शॉप फॉर चेंज.