शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
4
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
5
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
6
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
7
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
8
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
10
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
11
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
12
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
13
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
14
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
15
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
16
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
17
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
18
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
19
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
20
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 

नगरसेवकांचा निधी ठाणेकरांच्या हाती

By admin | Updated: March 2, 2017 03:30 IST

आपला नगरसेवक निधी, प्रभाग सुधारणा आणि मागासवर्गीय निधी नागरिकांनी सुचवलेल्या कामांवरच खर्च करावा लागणार आहे

ठाणे : ठाणे महापालिकेतील नगरसेवकांना यापुढे आपला नगरसेवक निधी, प्रभाग सुधारणा आणि मागासवर्गीय निधी नागरिकांनी सुचवलेल्या कामांवरच खर्च करावा लागणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली. यामुळे नगरसेवक निधीच्या नावाने होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराला लगाम बसणार आहे.नगरसेवक झाल्याने नगरसेवक निधी ताब्यात येईल आणि आपण हवी असलेली कामे करू, असे मांडे खात असलेल्या नगरसेवकांना पालिका प्रशासनाच्या या निर्णयाने धक्का बसला आहे. त्याचवेळी प्रभागातील कोणत्या कामांना अधिक महत्त्व दिले पाहिजे, याचा अंदाज आता थेट ठाणेकरांकडून घेतला जाणार असल्याने नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. आपल्या मतदारांना आपल्याकडून कोणत्या कामाची अपेक्षा आहे, याचा अंदाज नगरसेवकांनाही येईल आणि त्याच कामांना लोकप्रतिनिधी या नात्याने ते प्राधान्य देतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.आयुक्त जयस्वाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अनेक वेळा नगरसेवक हे आपल्या खिशातूनच प्रभागातील कामे करत असल्याचे भासवत असतात. त्यातूनच अनेकदा केवळ गटारे, पायवाटा आदी कामांवरच वर्षानुवर्षे निधी खर्च होत असतो. परंतु, आता नागरिकांनीच प्रभागातील कोणती कामे महत्त्वाची आहेत, याची यादी तयार करायची आहे.स्टेशन, चौकात सूचनापेट्याठाणे महापालिकेने ठाणेकरांच्या सूचना मागवल्या आहेत. त्यानुसार रेल्वे स्टेशन, महत्त्वाचे चौक, आदींसह इतर महत्त्वाच्या ठिकाणी आता सूचनापेट्या ठेवण्यात येणार असून या पेट्यांमध्ये पालिकेमार्फत देण्यात आलेले फॉर्म ठाणेकरांंनी भरून टाकायचे आहेत. त्यामुळे एखाद्या प्रभागातील नागरिक फूटओव्हर ब्रिजचा आग्रह धरतील, तर दुसरीकडे सब वे ची निकड असेल. विद्युतपोल, आरोग्यसेवा, अत्याधुनिक रुग्णालय, मलनि:सारण वाहिन्या, मलनि:सारण प्रकल्प आदींसह उड्डाणपूल आदी कामांची माहिती नागरिक भरून देऊ शकतील. (प्रतिनिधी) >१० दिवसांत करा सूचनागुरुवारपासून पुढील १० दिवस नागरिकांच्या सूचना मागवण्यात येतील. त्या एकत्रित करून त्यातील कोणती कामे महत्त्वाची आहेत, त्याची गरज आहे किंवा कसे, हे प्रशासन तपासून पाहील. या कामाकरिता निधीची तरतूद केली जाईल आणि त्यानंतर नगरसेवकांनी नगरसेवक निधी किंवा प्रभाग सुधारणा आणि मागासवर्गीय निधीतून एखादे काम करायचे ठरवल्यास त्यांना या कामांची यादी देऊन त्यानुसार निधीची उपलब्धता करून दिली जाणार आहे. विशेष म्हणजे या कामांचा समावेश आगामी अंदाजपत्रकात देखील केला जाणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले. या माध्यमातून विविध कामांमध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.>असा होतो नगरसेवक निधीत भ्रष्टाचारनगरसेवक निधी खर्च करण्याचे सर्वाधिकार नगरसेवकांकडे राहिले, तर ही कामे करणारे कंत्राटदार नगरसेवकांशी संगनमत करून ठरावीक कामे झोपडपट्ट्या व गलिच्छ वस्त्यांत करतात. बऱ्याचदा या कामांच्या निविदा अपेक्षित खर्चापेक्षा कमी दराच्या असतात. त्यामुळे निकृष्ट कामे केली जातात. काही वेळा तर यापूर्वी केलेली कामे रंगरंगोटी करून नव्याने केल्याचे भासवले जाते.>प्रत्येक नगरसेवकाला मिळतो२२ लाखांचा नगरसेवक निधी१३१ नगरसेवकांचा निधी २८ कोटी ८२ लाख, प्रत्येक प्रभाग सुधारणा निधी ४० लाख, ६२ प्रभागांमध्ये मिळून १३ कोटी २० लाख, मागासवर्गीय निधीचे मिळून ४० कोटी, एकूण ८२ कोटी प्रतिवर्षी