शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हा परिषदेच्या बोगस नियुक्तीपत्राने खळबळ

By admin | Updated: April 13, 2015 05:20 IST

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता पदासाठी नियुक्ती झाल्याचे बोगस नियुक्तीपत्र अहमदनगर जिल्ह्यातील एका उमेदवारास मिळाले आहे.

सुरेश लोखंडे, ठाणेजिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता पदासाठी नियुक्ती झाल्याचे बोगस नियुक्तीपत्र अहमदनगर जिल्ह्यातील एका उमेदवारास मिळाले आहे. मात्र या पदांच्या रिक्तजागा भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता संबंधीत उमेदवारास नियुक्तपत्र मिळाल्याच्या वृत्ताने ठाणे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे. या बोगस या नियुक्तीपत्राची छायांकित पत्र व्हॉटसअ‍ॅप वर मागील दोन दिवसांपासून फिरत असल्यामुळे सर्वत्र तर्कवितर्क काढले जात आहेत. जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ‘ज्युनिअर इक्झीक्युटीव इंजिनिअर’ पदासाठी नियुक्ती झाल्याचे पत्र नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील वाडझिरे गावातील उमेदवाराच्या नावचे हे बोगस नियुक्तपत्र व्हॉटसअ‍ॅप वर झळकत आहेत. या पत्रात १५ जून रोजी सर्व मुळकागदपत्रासह मुलाखतीला उपस्थित राहण्याचे स्पष्ट केलेले असतानाच ६ जुलैपासून जेईओ पदी रूजू होण्याचे सूचित करून पीडब्ल्यू विभागाच्या वेस्ट झोनला नियुक्तीचे ठिकाण नमूद करण्यात आले आहे. या नियुक्तिपत्रावर ठाणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र पाटील यांच्या नावासह स्वाक्षरी असून बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बलखंडे यांचे देखील नाव व स्वाक्षरी असून त्यांचे नाव चुकलेले आहे. परंतु या प्रकारचे कोणतेही नियुक्तीपत्र कोणत्याही उमेदवारास पाठवलेले नसल्याचे या दोन्ही अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना नमुद केले .