शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातून महिलेला 150 किलो गांजासह अटक

By admin | Updated: August 7, 2016 19:31 IST

महिलेला 150 किलो गांजासह ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी कळव्याच्या विटावा भागातून अटक केली.

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 7-  मुंबई, ठाणे आणि मुंब्रा भागात गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या कनिसा फारुख सरदार उर्फ खैरुल (35, रा. मुंब्रा) या महिलेला 150 किलो गांजासह ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी कळव्याच्या विटावा भागातून अटक केली. इतक्या मोठया प्रमाणात गांजा हस्तगत करण्याची ही पहिलीच तर अंमली पदार्थ हस्तगत करण्याची ठाणे पोलिसांची ही दुसरी कारवाई असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 22 लाखांचा गांजा आणि कार असा 30 लाखांचा ऐवज पोलिसांनी तिच्याकडून हस्तगत केला आहे.हैदराबाद येथून एका कारमधून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अमोल वालझडे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे खैरुल हिच्यावर गेल्या 15 दिवसांपासून पोलिसांनी पाळत ठेवली होती. ती शनिवारी ठाण्यात 'माल' घेऊन येणार असल्याची पक्की माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्त परमवीरसिंग, सहाय्यक पोलीस आयुक्त भरत शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम शेळके यांच्या मार्गदशनाखाली विटावा भागात पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय घोसाळकर, उपनिरीक्षक विजय उपाळे, विठ्ठल करंजुले, चंद्रकात घाडगे आणि वालझाडे आदींच्या पथकाने सापळा लावून तिला 6 ऑगस्ट रोजी रात्री 8 वा. च्या सुमारास अटक केली. ही कारवाई रविवारी पहाटे 5 वा. र्पयत सुरु होती. ठाणे न्यायालयाने तिला 9 ऑगस्टर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.................हैदराबाद कनेक्शनहैदराबाद येथील अण्णा आणि छोटू या दोघांकडून आणलेला गांजा ती मुंबईतील मालाड, मीरा रोड, ठाण्याच्या मुंब्रा, घोडबंदर रोड आणि गुजरातच्या काही भागांमध्ये विक्री करणार होती. यापूर्वीही गांजा प्रकरणात 2015 मध्ये ठाणे पोलिसांनी तिच्यासह तिच्या मेव्हण्यालाही (बहिणीचा पती) अटक केली होती. मात्र, तिच्याकडे त्यावेळी काहीच अमली पदार्थ न मिळाल्याने तिची जामीनावर सुटका झाली होती. जामीनावर सुटका झाल्यानंतर तिने पुन्हा हाच 'उद्योग' सुरु केला. हैदराबाद येथील गांजाची मुख्य तस्कर आण्णाच्या ती संपर्कात होती. त्याच्याच सांगण्यावरुन ती हे काम करीत होती. यात आणखी कोण कोण सहभागी आहे, याचा सर्व तपास आता सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.