शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर सेवा चार तास ठप्प

By admin | Updated: June 30, 2016 04:44 IST

मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर उपनगरीय सेवेची त्यातून सुटका होण्याची चिन्ह सध्यातरी दिसत नाही.

मुंबई : तांत्रिक समस्यांनी पछाडलेल्या मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर उपनगरीय सेवेची त्यातून सुटका होण्याची चिन्ह सध्यातरी दिसत नाही. बुधवारी संध्याकाळी ऐरोली स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरला विद्युत पुरवठा होण्यास तांत्रिक अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे ठाणे ते वाशी लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली. यामुळे लोकलच्या ४० फेऱ्या रद्द करण्यात आल्या.संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास ठाणे ते ऐरोली स्थानका दरम्यान अप (ठाणे दिशेने) मार्गावरील ओव्हरहेड वायरला विद्युत पुरवठा होण्यास अडचणी येऊ लागल्या. विद्युत पुरवठा होत नसल्याने लोकल पुढे सरकू शकत नव्हत्या. अप मार्गावरील लोकलचा वेग मंदावला. याची माहिती तांत्रिक कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांना फिडर वायर तुटल्याचे निदर्शनास आले. तोपर्यंत ठाणे ते वाशी, नेरुळ अप मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली. लोकल पुढे सरकू शकत नसल्याने डाऊन दिशेला जाणाऱ्या लोकल सेवांवरही त्याचा परिणाम झाला आणि त्या मार्गावरील लोकल फेऱ्याही बंद झाल्या. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने कामावरुन घरी परतणाऱ्यांचे मात्र हाल झाले. तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा सुरु होण्यास थोडा अवधी लागेल अशी उद्घोषणाही केली जात असल्याने प्रवाशांकडून स्थानकांबाहेर येत अन्य सेवांचा पर्याय निवडला जात होता. अनेकांनी एसटी बस आणि टीएमटी तसेच एनएमएमटीचा आधार घेतल्याने एकच गर्दी बसेसना झाली. तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी रेल्वेकडून पावणे आठ वाजल्यापासून पॉवर ब्लॉक घेण्यात आला. रात्री ८.५१ पर्यंत चाललेल्या पॉवर ब्लॉकमध्ये काम पूर्ण करण्यात आले. लोकल सुरु होण्यास रात्री सव्वा नऊ वाजले. ओवरहेड वायरला विद्युत पुरवठा होत नसल्याची तांत्रिक समस्या सुटलेली असतानाच तांत्रिक बिघाडाची आणखी एक घटना घडली. ठाण्याला येणाऱ्या एका लोकलचा पेंटाग्राफ ऐरोलीजवळच ओवरहेड वायरमध्ये अडकला. रात्री ९.२८ वाजता घडलेल्या या घटनेने प्रवाशांच्या त्रासात आणखी एक भर पडली. त्यात आणखी एक तास गेला. (प्रतिनिधी)