शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात धाडसत्र सुरूच

By admin | Updated: June 28, 2017 01:35 IST

पाच लीटरमागे तब्बल २१० मिली लीटरचे माप कमी करुन ग्राहकांची लूट करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथील प्रथमेश पेट्रोलियम

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पाच लीटरमागे तब्बल २१० मिली लीटरचे माप कमी करुन ग्राहकांची लूट करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथील प्रथमेश पेट्रोलियम या पंपासह दोन पंपांवर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली. तसेच नागपूर येथील कारवाईत तिघांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आतापर्यंत कारवाई झालेल्या पंपांची संख्या ४७ वर पोहोचली आहे.पेट्रोल पंपावरुन होणारी ग्राहकांची लूट ठाणे पोलिसांनी राज्यभरातील अनेक पंपाववरील कारवाईतून उघडकीस आणली. रविवारी हे पथक मुख्यमंत्र्यांच्या नागपूर मतदारसंघात धडकले. तिथेही रविवार आणि सोमवारच्या कारवाईत मानकापूर कोरोडी रोडवरील रबज्योत या पेट्रोल पंपावरुन वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने तिघांना अटक केली. त्यापाठोपाठ नाशिक, पुणे, ठाणे आणि औरंगाबाद येथेही कारवाईचे हे सत्र मंगळवारीही सुरुच होते. ठाणे जिल्हयातील टिटवाळा येथे दुपारी २ ते सायंकाळी ६ या दरम्यान प्रथमेश पेट्रोलियम या पंपावर गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईत पाच लीटरमागे सुमारे २१० मिली लीटर पेट्रोल कमी देण्यात येत असल्याचे उघड झाले. ही तफावत उघड होताच याठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यात आली. तर ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील जीजी पंपावरही रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरु होती. या कारवाईसह नाशिक, औरंगाबाद आणि पुण्यातील कारवाई अपूर्ण असल्यामुळे येथील सविस्तर माहिती देणे शक्य नसल्याचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले.