शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे रेल्वे स्थानकात २५ हजार फुकटे!

By admin | Updated: July 8, 2017 05:39 IST

लोकलने विनातिकीट प्रवास करणे हा कायद्याने सामाजिक गुन्हा आहे. याबाबत रेल्वेला सहकार्य करावे, असे प्रवासात आपण ऐकत

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : लोकलने विनातिकीट प्रवास करणे हा कायद्याने सामाजिक गुन्हा आहे. याबाबत रेल्वेला सहकार्य करावे, असे प्रवासात आपण ऐकत असतो. रेल्वेने वारंवार सूचना करूनसुद्धा लोकलने फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी होण्याऐवजी ती दिवसेंदिवस वाढत आहे. ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकात मे ते जून २०१७ या ३ महिन्यांत सुमारे ५ हजार तर मागील वर्षभरात २० हजारहून अधिक फुकटे ठाणे स्थानकात टीसींंच्या जाळयात अडकले आहेत. त्यांच्याकडून ६२ लाखांहून अधिक दंडही वसूल केल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.ठाणे स्थानकात दररोज सुमारे ७-८ लाख प्रवासी येजा करीत असल्याने ते नेहमीच गजबलेले असते. येथे एकूण १० फलाट असून, मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल धावतात. त्यातच या स्थानकातून आतबाहेर करण्यासाठी जवळपास अधिकृत १९ मार्गिका आहेत. त्यामधील फलाट क्रमांक २ आणि १० यावरून थेट बाहेर पडणे शक्य होते. शहराचे दिवसेंदिवस झपाट्याने नागरिकरण होत असल्याने त्याचा स्थानकावर ताण पडतो.सर्वाधिक व्यस्त स्थानक अशी ओळख असलेल्या या स्थानकातून ठाणे ते बोरीबंदर ही पहिली लोकल धावली. या रेल्वे स्थानकाला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याने येथे पहिल्या सरकत्या जिन्यापासून वातानुकूलित शौचालयासह अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची व्यवस्था केली. त्यातच, मुंबईच्या आसपासच्या शहरांमध्ये येण्याजाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकाची मदत होत असल्याने या स्थानकात लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येतदेखील वाढ झाली आहे. फुकट्यांना पकडण्यासाठी सुमारे २४ टीसींची मंजूर पदे आहेत. त्यांनी एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या वर्षभरात २० हजार २४५ विनातिकीट प्रवाशांना पकडून सुमारे ४८ लाख ६९ हजार ८१२ रुपयांचा दंड वसूल केला. विशेष म्हणजे अशा प्रकारे फुकट प्रवास करणारे प्रवासी हे फलाट क्र मांक २, ९ व १० वर अधिक प्रमाणात आढळून आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.फुकट्यांमुळे रेल्वे मालामाल ठाण्यात पकडलेल्या फुकट्यांकडून जर ६२ लाख २८ हजार ५२७ रुपये वसूल केला आहे. जर त्यांनी तिकीट काढून प्रवास केला असता, तर रेल्वेच्या तिजोरी काही लाख रुपये जमा झाले असते. मात्र, या फुकट्यांमुळे रेल्वेच्या तिजोरीत ६२ लाखांहून अधिक रक्कम दंड स्वरूपात जमा झाल्याने रेल्वे मालामाल झाली आहे.यंदा आकडा वाढला : २०१५-१६ मध्ये ठाण्यात ७ हजार ९९२ विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना पकडले होते. त्यावेळी त्यांच्याकडून २२ लाख ६३ हजार दंड वसूल केला होता. तर २०१६-१७ या वर्षात हा आकडा चक्क २० हजार २४५ वर गेल्याने फुटक प्रवास करताना पकडणाऱ्यांची संख्या तिपटीने वाढली आहे. तसेच त्यांच्याकडून ४८ लाख ६९ हजार ८१२ रुपये दंड वसूल केल्याचे रेल्वेने सांगितले.