शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

तपासासाठी ठाणे पोलीस नागपुरात

By admin | Updated: March 19, 2017 02:02 IST

सैन्य भरती घोटाळा प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढत असताना या परीक्षा यंत्रणेबाबतच्या सैन्य दलातील संबंधितांचे जबाब नोंदवण्यासाठी तसेच हस्ताक्षरांचे नमुने घेण्यासाठी

ठाणे : सैन्य भरती घोटाळा प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढत असताना या परीक्षा यंत्रणेबाबतच्या सैन्य दलातील संबंधितांचे जबाब नोंदवण्यासाठी तसेच हस्ताक्षरांचे नमुने घेण्यासाठी ठाणे पोलिसांचे एक विशेष पथक नागपूरला रवाना झाल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या कामासाठी हे पथक काही दिवसांसाठी नागपुरात तंबू ठोकणार असल्याने आणखी काही उलगडा होण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून वर्तवली जात आहे. २६ फेब्रुवारीला देशभरात सैन्यातील ४ पदांसाठी पार पडलेल्या लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडल्याप्रकरणी आतापर्यंत २४ जणांना ठाणे पोलिसांनी नागपूर, पुणे, गोवा येथून अटक केली आहे. तसेच सध्या ते सर्व जण न्यायालयीन कोठडीत आहेत. यामध्ये काही आजी-माजी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. नागपूर येथील सैन्य भरती कार्यालयातील लिपिक रवींद्रकुमार जांगू, धरमवीरसिंग आणि निगमकुमार पांडे हे या टोळीतील प्रमुख आरोपी आहेत. त्यांनी या घोटाळ्यातील पैशांची आग्रा आणि हरयाणा येथे मालमत्ता खरेदी केल्याची बाब पुढे आहे. याचदरम्यान तपासात रवींद्रकुमार जांगू याने सैन्य भरतीच्या मंडळाच्या दिल्ली येथील मुख्यालयातून प्रश्नपत्रिकेची सीडी नागपूर येथील कार्यालयाकडे छापण्यासाठी पाठवल्यानंतर तिचा पासवर्ड मिळाला होता. मात्र, तो कसा मिळवला, हे पोलिसांना सांगितल्यावर पोलिसांनी त्यानुसारच त्याला प्रात्यक्षिक करून तो पासवर्ड ओळखण्यास सांगितले होते. पण त्या वेळी रवींद्रकुमार याला तो ओळखता आला नाही. ठाणे गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे, कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांचे पथक याबाबतच्या अधिक तपासासाठी नागपुरात नुकतेच दाखल झाले आहे. (प्रतिनिधी) जबाब नोंदविणारअधिक तपासासाठी नागपुरात नुकतेच पथक दाखल झाले आहे. हे पथक परीक्षा केंद्रावरील कारवाईदरम्यान मिळून आलेल्या विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर नमुने तसेच या परीक्षा यंत्रणेबाबतच्या नागपूर येथील सैन्य कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवून घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.