ठाणे : गेल्या काही दिवसांत ठाणे आणि डोंबिवलीतील बांधकाम व्यावसायिक आणि राजकीय नेत्यांना खंडणीसाठी रवी पुजारी टोळीकडून धमक्या येत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्याच्या दिल्लीतील बहिणींची गुरुवारी दिवसभर चौकशी करण्यात आली. मात्र, या चौकशीत विशेष काही हाती लागले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.ठाण्यातील काही बांधकाम व्यावसायिकांना खंडणीसाठी गेल्या काही दिवसांपासून धमक्या येत होत्या. या प्रकरणी आठवड्यापूर्वीच कैलास प्रधान (४०), गौरव शर्मा (३८), हनुमान म्हात्रे (५०) आणि काशिनाथ पाशी (४९) या चौघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली होती. (प्रतिनिधी)
ठाणे पोलिसांनी केली पुजारीच्या बहिणींची चौकशी
By admin | Updated: April 24, 2015 01:10 IST