शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील पेट्रोल पंप घोटाळ्याचा सूत्रधार गजाआड

By admin | Updated: July 12, 2017 11:40 IST

ठाण्यात इलेक्ट्रॉनिक चीपद्वारे पेट्रोलच्या मापात पाप करणारा सूत्रधार प्रशांत नूलकर याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ठाणे क्राईम ब्रांचनं ही कारवाई केली आहे.

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 12 -  ठाण्यात इलेक्ट्रॉनिक चीपद्वारे पेट्रोलच्या मापात पाप करणारा सूत्रधार प्रशांत नूलकर याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ठाणे क्राईम ब्रांचनं ही कारवाई केली आहे. कर्नाटकमधील हुबळीमधून प्रशांत नूलकरला ताब्यात घेण्यात आले.  
इंधन भरण्याच्या यंत्रामध्ये छेडछाड करुन घोटाळा केल्याचे प्रकरण समोर आले होते.  पेट्रोल वेन्डिंग मशिनमध्ये झालेल्या छेडछाडीमुळे ग्राहकाला 4 ते 5 टक्के पेट्रोल कमी मिळायचे. म्हणजेच एका लिटरमागे जवळपास 20 मिलीलिटर इंधनाचा घोटाळा होत होता.  एवढ्या मोठ्या ग्राहकांची फसवणूक सुरू आहे.
 
चिपद्वारे होत असलेली पेट्रोलचोरी पकडण्यासाठी ठाणे क्राईम ब्रांचकडून राज्यभरात धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. मागील एक महिन्यात ठाण्यातील 98 पेट्रोलपंप सील करण्यात आले. ठाणे क्राईम ब्रांचने मे महिन्यात प्रशांत नूलकरचा साथीदार विवेक शेट्येला अटक केली होती. त्यानेच या चिप देशभरातील पेट्रोल पंपावर पुरवल्या आहेत. प्रशांत नूलकर आणि विवेक शेट्ये यांच्यासह ठाणे पोलिसांनी यापूर्वी सहा जणांना अटक केली आहे.    
 
आणखी बातम्या वाचा
दरम्यान,  ठाणे पोलिसांनी राज्यभर केलेल्या कारवाईमध्ये आतापर्यंत 50 पेट्रोल पंपांची तपासणी करून यापैकी 32 पंपांना सील ठोकले आहे.  आतापर्यंतच्या कारवायांमध्ये 14 आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यापैकी सात जण न्यायालयीन, तर सात जण पोलीस कोठडीत होते. काही पेट्रोल पंपांच्या डिन्स्पेन्सिंग युनिटमध्ये चिनी बनावटीच्या इलेक्ट्रॉनिक चिप्स पोलिसांना आढळल्या.