ठाणे : ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील भूजल पातळी कमालीची खालावली आहे. या दोन्ही जिल्ह्यांमधील १४ तालुक्यांमधील पाण्याने तळ गाठल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या भूजल सर्वेक्षण खात्याने सादर केलेल्या अहवालामध्ये नमूद केली आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर, ठाणे आणि अंबरनाथ या तालुक्यांमधील ३८ विहिरींची नुकतीच पाहणी केली. भिवंडीतील ८ विहिरींची पाहणी केली असता या ठिकाणी ४.२१ मीटरवर पाणी गेल्याचे आढळले. मागील वर्षांच्या तुलनेत ही पाणीपातळी ०.१२ मीटरने घसरली आहे. कल्याणातील पाणीपातळी १.१० मीटर असून ती १.२२ ने घसरली आहे. मुरबाडमधील पाणीपातळी ४.५६ असून ती केवळ ०.४ ने खाली आली आहे. शहापुरात पाण्याची पातळी ३.१० असून ती ०.३ ने घसरली आहे. ठाण्याची पाणीपातळी २.५७ असून ती ०.१८ ने घसरली आहे. तर अंबरनाथमधील पाण्याची पातळी ३.५३ मीटर असून ती ०.०९ ने घसरल्याचे समोर आले आहे. डहाणूची पाणीपातळी ०.३६ ने, जव्हारची ०.१४, मोखाडा ०.०३, पालघर ०.२६, तलासरी ०.०९, वाडा ०.२३ आणि विक्रमगडची पातळी ०.११ ने घसरली.(प्रतिनिधी)
ठाणे-पालघरमध्ये पाण्याने तळ गाठला
By admin | Updated: April 20, 2015 02:31 IST