शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता कर वसुलीकरिता ठाणे पालिका कापणार वीज

By admin | Updated: March 25, 2017 02:38 IST

मालमत्ताकराच्या थकबाकीदारांसाठी ‘अभय योजना’ पुन्हा लागू करण्यासाठी राजकीय मंडळींचा हट्ट सुरू असताना, थकबाकीदारांची वीज कापण्याचे आदेश

ठाणे : मालमत्ताकराच्या थकबाकीदारांसाठी ‘अभय योजना’ पुन्हा लागू करण्यासाठी राजकीय मंडळींचा हट्ट सुरू असताना, थकबाकीदारांची वीज कापण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. कारवाईच्या पहिल्या टप्प्यात एक लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ५०० थकबाकीदारांची यादी महापालिका प्रशासनाने महावितरणला सादर केली असून, त्यांची बत्ती गुल करण्याची दाट शक्यता आहे.ठाणे महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन असलेल्या जकातीपाठोपाठ, एलबीटी वसुलीदेखील बंद झाली आहे. त्यामुळे इतर उत्पन्नांच्या स्रोतांची वसुली करण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. मालमत्ताकर विभागाला यंदा ४५६ कोटींचे लक्ष्य दिले असून, आतापर्यंत ३३० कोटींची वसुली झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही वसुली २५ कोटींपेक्षा अधिक आहे, परंतु मागील काही वर्षांत थकबाकीदारांचे प्रमाण वाढले असून, थकबाकीची ही रक्कम १०० कोटी रुपयांच्या वर गेली आहे. पालिकेने आता या थकबाकीदारांविरोधात मोहीम उघडली आहे. घनकचरा उचलण्याकरिता लागू केलेल्या कराच्या वसुलीकरिता, गुरुवारी महापालिकेने व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर ‘कचरा फेको’ आंदोलन केले. यामुळे राजकीय वातावरण तापले. आता मालमत्ताकराची थकबाकी वसूल करण्यासाठी वीजपुरवठाच खंडित करण्याचा मार्ग महापालिकेने अवलंबला आहे. ज्यांची विजेची थकबाकी शून्य आहे, परंतु मालमत्ताकराची थकबाकी लाखभर रुपये आहे, अशांची वीज कापण्याचा निर्णय कायद्याच्या निकषावर कसा टिकतो व महावितरण महापालिकेची थकबाकी वसूल करण्याकरिता आपल्या ग्राहकांवर किती तत्परतेने कारवाई करते, याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत. पहिल्या टप्प्यात एक लाखांच्या वर थकबाकी असलेल्यांची बत्ती गुल केली जाणार आहे. ही थकबाकी असलेल्यांची संख्या ५०० च्या वर आहे.(प्रतिनिधी) ी