शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे मोबाईल चोरी: सीसीटीव्हीतील चित्रण पोलिसांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 21:31 IST

आॅनलाईन लोकमत ठाणे, दि. 18 : शहरातील चरई भागातील ‘मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस’ या दुकानातून चोरट्यांनी विविध नामांकित कंपन्यांचे ...

आॅनलाईन लोकमत ठाणे, दि. 18 : शहरातील चरई भागातील ‘मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस’ या दुकानातून चोरट्यांनी विविध नामांकित कंपन्यांचे १० लाख १७ हजारांचे ७१ मोबाइल लांबविल्याची घटनेचे चित्रण एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून ते नौपाडा पोलिसांच्या हाती लागले आहे. आता या चित्रणच्या आधारावर या चोरीचा तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. रविवारी पहाटेच्या सुमारास जुन्या मुंबई रस्त्यावरील भरत जैन यांच्या दुकानाचे तोडून चोरटयांनी ही चोरी केली. त्यांनी कपाटातील सुमारे ७१ मोबाइल लंपास केले. या दुकानातील सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाले असून यात दोघा जणांचा समावेश असल्याचे स्पष्ट दिसते. अवघ्या काही मिनिटांमध्ये अत्यंत चलाखीने हे दोघेही आपल्या बॅगांमध्ये मोबाईल भरतांना यात पहायला मिळते. रेनकोट परिधान केलेले २० ते २५ वयोगटातील हे तरुण असल्याचे यात आढळले आहे. ते दोघेच होते की त्यांच्याबरोबर अन्य कोणती टोळी होती, याचाही तपास सुरु असून त्या परिसरातील सर्व सीसीटीव्हींची पडताळणी केली जात असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाच्या तपासासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे, विशाल बनकर आणि उपनिरीक्षक शिरीष यादव या तीन अधिकाऱ्यांच्या पथकांकडून तपास सुरू आहे. आतापर्यंत या परिसरातील आठ ते दहा जणांची चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.  

https://www.dailymotion.com/video/x8458qd