शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे मेट्रो स्टेशनची कामे लवकरच सुरू

By admin | Updated: March 3, 2017 03:19 IST

मेट्रो प्रकल्प क्रमांक-४ अर्थात वडाळा-घाटकोपर- मुलुंड- ठाणे- कासारवडवली मार्गातील विविध ३३ रेल्वे स्थानकांच्या कामांसाठी एमएमआरडीएने निविदा मागवल्या आहेत.

नारायण जाधव,ठाणे-  शहराच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या मुंबई मेट्रो प्रकल्प क्रमांक-४ अर्थात वडाळा-घाटकोपर- मुलुंड- ठाणे- कासारवडवली मार्गातील विविध ३३ रेल्वे स्थानकांच्या कामांसाठी एमएमआरडीएने निविदा मागवल्या आहेत. कोणी अडथळे आणले नाहीत, तर लवकरच ठाण्यातील या ११ स्थानकांच्या बांधकामास सुरुवात होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.यात मुलुंडमधील २ आणि ठाणे शहरातील ११ स्थानकांच्या कामांचा समावेश असून दोन टप्प्यांत होणाऱ्या या कामांवर सुमारे १०७७ कोटी ३० रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या कामात केवळ एलिव्हेटेड रेल्वे स्थानकांच्या डिझाइन आणि बांधकामाचा समावेश असून वास्तुकला फिनिशिंग आणि स्टीलच्या छताच्या कामासाठी वेगळ्या निविदा मागवण्यात येणार आहेत. मुलुंड फायर स्टेशन आणि मुलुंड नाका या मुंबईतील दोन स्थानकांसह ठाण्यातील तीनहातनाका, आरटीओ ठाणे, महापालिका मार्ग, कॅडबरी जंक्शन आणि माजिवडा या स्थानकांच्या कामावर ५२९ कोटी ६७ लाख, तर कापूरबावडी, मानपाडा, टिकुजिनीवाडी,डोंगरीपाडा, विजय गार्डन आणि कासारवडवली या स्थानकांच्या कामावर ५४७ कोटी ६३ लाख असे एकूण १०७७ कोटी ३० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. >पॉवरलूमसह ग्रोथ सेंटरला होणार फायदाराज्याच्या नगरविकास विभागाने गेल्या वर्षी मंजुरी दिलेल्या मेट्रो-५ अर्थात ठाणे-भिवंडी-कल्याण या ८४१६ कोटी रुपये खर्चाच्या मार्गाचा डीपीआर अर्थात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाला असून त्याच्या कामांना सुरुवात करण्यासाठी राज्य मंत्रीमंडळ लवकरच आपली मोहोर उमटवणार असल्याचे वृत्त आहे. यामुळे पॉवरलूमनगरीसह सांस्कृतिकनगरी म्हणून ओळख असलेल्या कल्याण-डोंबिवली शहरांसह नजीकच्या परिसराचे रूपडे पालटून विकासास गती मिळण्यास मदत होणार आहे. भिवंडीत पॉवरलूम उद्योगासह मोठ्या प्रमाणात गोदामे असून येथे लॉजिस्टिक हब विकसित करण्याचा शासनाचा मानस आहे. कल्याणनजीकच्या शीळफाटा परिसरात ग्रोथ सेंटरसाठी जमीन संपादनाच्या कामास सुरुवात झालेली आहे. भविष्यात हे ग्रोथ सेंटर नवी मुंबई मेट्रोला जोडण्यास येणार आहे.वडाळाा भक्तीपार्क ते भांडुप सोनापूरपर्यंतच्या २० स्थानकांची कामे तीन टप्प्यांत तर मुलुंड ते कासारवडवलीपर्यंतची १३ स्थानकांची कामे अन्य दोन टप्प्यांत होतील.