शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापौर मॅरेथॉनही होणार ‘सैराट’मय?

By admin | Updated: August 12, 2016 02:15 IST

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा येत्या २८ आॅगस्ट रोजी होणार आहे. परंतु, आधीच आॅडिट आणि या स्पर्धेवर होणाऱ्या लाखो रुपयांच्या उधळपट्टीच्या मुद्यावरून

ठाणे : ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा येत्या २८ आॅगस्ट रोजी होणार आहे. परंतु, आधीच आॅडिट आणि या स्पर्धेवर होणाऱ्या लाखो रुपयांच्या उधळपट्टीच्या मुद्यावरून या स्पर्धेवर टीकेची झोड उठत असतानाच आता आणखी एका टीकेला तोंड देण्याची वेळ आयोजकांवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या स्पर्धेला इव्हेंटचे स्वरूप देतानाच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी ‘सैराट’ चित्रपटातील कलाकारांना या स्पर्धेसाठी पाचारण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, प्रत्येक कलाकाराने पाच लाखांचे मानधन मागितल्याने त्यांना बोलवायचे की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर, दुसरीकडे भारतीय क्रिकेट संघातील महाराष्ट्राच्या मातीतील प्रतिभावंत खेळाडू अजिंक्य रहाणे यानेदेखील एक कोटीच्या मानधनाची मागणी केल्याने आयोजकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. ‘सैराट’च्या टीमला कोणत्याही परिस्थितीत आणण्यासाठी आयोजकांचा हट्ट असून रहाणे यांच्यासाठी पालिका एवढी रक्कम मोजण्यास तयार नाही.मागील २६ वर्षे सातत्याने महापौर वर्षा मॅरेथॉन राबवणाऱ्या ठाणे महापालिकेला या स्पर्धेसाठी केला जाणारा खर्च पेलवणे कठीण झाल्याने त्यांनी यंदाची महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेने या स्पर्धेसाठी ४० लाखांची तरतूद केली आहे. परंतु, दरवर्षी ती अपुरी ठरत असल्याचे नंतर लक्षात येते.हे लक्षात घेऊनच यंदा या स्पर्धेला वेगळी उंची गाठून देण्यासाठी काहीही करण्याच्या तयारीत ते आले आहेत. त्यामुळेच यंदा मराठी चित्रपट क्षेत्रात वेगळी उंची गाठलेल्या ‘सैराट’ चित्रपटातील कलाकारांची फौज मॅरेथॉन स्पर्धेसाठी पाचारण करण्याचे महापौरांनी जाहीर केले होते. या स्पर्धेत सहभागी होणारे स्पर्धकदेखील या कलाकारांकडे बघून सैराट होऊन त्यांनी ही स्पर्धा गाजवावी, असाच काहीसा यामागचा हेतू असल्याचे बोलले जात आहे. तसेच सध्या भारतीय क्रिकेट टीममध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणारा महाराष्ट्राचा पुत्र अजिंक्य रहाणे यालाही पाचारण करण्याचा स्पर्धेच्या आयोजकांचा प्रयत्न आहे. मात्र, त्याने सुमारे एक कोटीचे मानधन मागितल्याची चर्चा सध्या पालिका वर्तुळात आहे. परंतु, पालिकेने एवढा खर्च करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)