शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे विधानपरिषद निवडणूक, वसंत डावखरे विरुद्ध रविंद्र फाटक

By admin | Updated: May 17, 2016 09:43 IST

ठाणे विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे रविंद्र फाटक विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे असा सामना रंगणार आहे.

ऑनलाइन लोकमत 

ठाणे, दि. १७ - ठाणे विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे रविंद्र फाटक विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे असा सामना रंगणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली. संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी शिवसेनेकडून शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची चर्चा आहे. 
 
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणे विधानपरीषद निवडणुकीसाठी काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली. महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांनी रविंद्र फाटक यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.१९९२ पासून चारवेळा विधानपरिषदेवर निवडून गेलेले वसंत डावखरे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी त्यांचे प्रयत्न करत होते. यापूर्वीही ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर निवडून जाताना डावखरेंना शिवसेनेबरोबर असलेल्या जवळीकीचा फायदा झाला होता.
 
शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या काळापासून डावखरे यांचे शिवसेनेशी संबंध सलोख्याचे राहिले आहेत.
त्यांना काँग्रेसचा पाठिंबा आहे. राष्ट्रवादीसोबत अपक्ष, इतर छोटे पक्ष आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे किंगमेकर असलेले बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्यावर डावखरे यांची भिस्त आहे.
 
मात्र सत्ताधारी पक्षांना न दुखावण्याची ठाकूर यांची राजकीय परंपरा पाहता त्यांच्या पाठिंब्याविषयी डावखरे साशंक असल्याचे मानले जाते. त्यामुळेच शिवसेनेने उमेदवार उभा न करता आपल्याला पाठिंबा द्यावा, यासाठी डावखरे यांचे प्रयत्न सुरू होते.
 
दुस-या बाजूला रविंद्र फाटक हे काहीवर्षांपूर्वी काँग्रेस नेते नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. २०१४ मध्ये त्यांनी राणेंची साथ सोडून ते शिवसेनेत दाखल झाले.  त्यांनी दोनवेळा विधानसभेची निवडणूक लढवली पण दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला. २००९ मध्ये भाजपच्या प्रमोद जठार यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघातून त्यांचा अवघ्या ३४ मतांनी पराभव केला होता. २०१४ मध्ये ठाणे शहर मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवताना त्यांना भाजपच्या संजय केळकर यांनी पराभूत केले होते.