शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
3
'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार
4
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील पाण्यात
5
'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल! 
6
कॉलर पकडली, फरफटत नेलं, बेदम मारलं; भाजपा नेत्याच्या समर्थकांची आयुक्तांना मारहाण
7
'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...
8
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
9
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
10
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
11
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 
12
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
13
Sangareddy Pharma Company Blast: फॅक्ट्रीमध्ये ब्लास्ट, 'सिगाची'चा शेअर जोरदार आपटला; प्लांट बंद, उत्पादनावर मोठं संकट
14
"तो दहशतवाद नाही, त्यांचा संघर्ष", पाकिस्तानचे सैन्य प्रमुख मुनीर यांचे 'नापाक' बोल; भारताबद्दल काय म्हणाले?
15
IND vs ENG: जसप्रीत बुमराहला बाहेर बसवा, 'या' गोलंदाजाला संघात घ्या; अनुभवी ग्रेग चॅपल यांचा सल्ला
16
या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश
17
Viral Video: पाळीव कुत्र्यासोबत सायकलवरून १२००० किमी प्रवास, तरुणाचा व्हिडीओ व्हायरल
18
४४० व्होल्टचा झटका! स्मार्ट मीटरच्या नावाने स्कॅम; ६८ लाखांचं बिल पाहून वृद्धाची बिघडली प्रकृती
19
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
20
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन

‘त्या’ झाल्या सक्षम ठाणे अंमलदार

By admin | Updated: March 9, 2016 00:42 IST

‘जय हिंद, ठाणे अंमलदार पोलीस नाईक अंजली नागरगोजे बोलतेय...’ असा प्रतिसाद शहर पोलीस ठाण्यातून येत होता.

बारामती : ‘जय हिंद, ठाणे अंमलदार पोलीस नाईक अंजली नागरगोजे बोलतेय...’ असा प्रतिसाद शहर पोलीस ठाण्यातून येत होता. असेच काही चित्र बारामती उपविभागातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये होते. महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस ठाण्यांचा कारभार तितक्याच समर्थपणे महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सांभाळला.जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बारामती उपविभागातील बारामती शहर, बारामती ग्रामीण, वडगाव निंबाळकर, भिगवण, इंदापूर, जंक्शन (वालचंदनगर) पोलीस ठाण्यांमध्ये महिला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सकाळपासूनच कार्यभार सांभाळला. त्यामुळे पोलीस ठाण्यांमध्ये ‘महिला राज’ असल्याचे चित्र दिसले. महिला दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचा कारभार महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे आज देण्याचे आदेश होते. त्याची अंमलबजावणी झाली. त्याचबरोबर, आम्हीदेखील पुरुष पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांपेक्षा कमी नाही, असेच दिवसभराचा कार्यभार संभाळताना दिसून आले. महिला पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह होता. बारामती शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी दिलेल्या सूचनेनुसार सकाळपासून कार्यभार पोलीस उपनिरीक्षक वर्षा जगदाळे यांनी दुपारी ३ पर्यंत सांभाळला. त्यानंतर दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत कार्यभार पोलीस नाईक अंजली नागरगोजे यांच्याकडे होता. आज शहर पोलीस ठाण्यात तक्रारींचे प्रमाणदेखील कमी होते; परंतु बारामती शहरसारख्या मोठ्या पोलीस ठाण्याची जबाबदारी पार पाडताना आव्हान असल्याचे वाटले. पण, हा अनुभव महत्त्वाचा आहे, असे कार्यभार सांभाळलेल्या नागरगोजे यांनी सांगितले. शहर पोलीस ठाण्यात १ पोलीस उपनिरीक्षक व १४ महिला पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. ग्रामीण पोलीस ठाण्याचा कार्यभार महिला पोलीस सारिका जाधव यांच्याकडे होता. या काळात ३५४चा गुन्हा ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाला. गुन्हा दाखल करण्याच्या पद्धतीची माहिती यामुळे मिळाली. पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनासह पोलीस ठाण्यातील सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून दिवसभराचे कामकाज पार पाडता आले. या दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये महिला पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब बांगर यांनी घेतली. त्यांनी त्यांचे कौतुक केले. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या ठाणे अंमलदार म्हणून पोलीस नाईक रेणुका पवार यांनी सकाळी १० पासून चार्ज घेतला. या काळात सुपे येथील मारामारीचा गुन्हा दाखल झाला. वर्षभरापासून ठाणे अंमलदार म्हणून काम करण्याचा अनुभव आहेच; परंतु आज महिला दिनाच्या निमित्ताने वेगळा अनुभव मिळाला. सकाळपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांपासून त्याची अंमलबजावणी करण्यापर्यंत सर्व काम केले. महिलांना पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची संधी दिल्यास त्या सोने करतात, अशी प्रतिक्रिया या महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची होती. बारामती उपविभागाच्या सर्वच पोलीस ठाण्यांत महिला राज अवतरले होते. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात ५ महिला कर्मचारी आहेत. त्यांपैकी दोघी सुट्टीवर होत्या. तीन महिला कार्यरत होत्या.