शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे-डोंबिवली पुन्हा १४ मिनिटांत

By admin | Updated: May 30, 2016 02:17 IST

ठाणे ते डोंबिवली हे अंतर जलद लोकलने कापण्यासाठी सध्या ३० मिनिटे लागत आहेत.

मुंबई : ठाणे ते डोंबिवली हे अंतर जलद लोकलने कापण्यासाठी सध्या ३० मिनिटे लागत आहेत. मात्र पुन्हा हे अंतर १४ मिनिटांतच कापता येणार आहे. परंतु, यासाठी प्रवाशांना एक आठवडा प्रतीक्षा करावी लागणार आहे. पारसिक बोगद्यातील रूळांखालील खडी बदलण्याचे काम एका आठवड्यात पूर्ण होणार आहे. तसेच पारसिक बोगद्यात असलेली ताशी ३० किमीची वेगमर्यादाही शिथिल करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे.डीसी-एसी परिवर्तन झाल्यापासून पारसिक बोगद्याजवळ ताशी ३० किमीची वेगमर्यादा लावण्यात आली आहे. त्यातच पावसाळा तोंडावर आल्याने पारसिक बोगद्यात रूळांखालील खडी बदलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जलद लोकलच्या ‘धिम्या’ गतीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. पारसिक बोगद्यात सातत्याने पाणी झिरपत असल्याने रूळाखालील खडी ठिसूळ झाली आहे. खडी रुळांना आधार देण्याचे काम करते. त्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांना हादरे बसू नयेत, यासाठी मध्य रेल्वेने खडी बदलण्याचे काम हाती घेतले आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून एका आठवड्यात काम पूर्ण होईल व पुन्हा ठाणे ते डोंबिवली हे अंतर १४ ते १५ मिनिटांत कापणे शक्य होईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.