शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

ठाणे चेकमेट दरोडा : चार आरोपींना न्यायालयीन कोठडी

By admin | Updated: July 20, 2016 19:52 IST

येथील चेकमेट सर्व्हिसेस प्रा.लि. या दरोड्यातील वैभव लहांमगे, लकी ऊर्फ लक्ष्मण गोवर्धने, हरिभाऊ वाघ आणि भास्कर ऊर्फ भरुण संतोष शिंदे या चौघा आरोपींना आता न्यायालयीन कोठडीत

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि.20 -  येथील चेकमेट सर्व्हिसेस प्रा.लि. या दरोड्यातील वैभव लहांमगे, लकी ऊर्फ लक्ष्मण गोवर्धने, हरिभाऊ वाघ आणि भास्कर ऊर्फ भरुण संतोष शिंदे या चौघा आरोपींना आता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाण्याच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के.एल. गुप्ता यांनी दिले आहेत. आतापर्यंत लुटीतील ११ कोटींपैकी १० कोटी आठ लाख रुपये ठाणे पोलिसांनी हस्तगत केले असून याप्रकरणी १६ जणांना अटक केली आहे.नाशिकमधून ६ जुलै रोजी हरिभाऊसह वरील या चौघांना स्थानिक पोलिसांच्या मदतीने ठाणे पोलिसांनी अटक केली होती. त्यांना आधी ठाणे न्यायालयाने १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. त्यानंतर, पुन्हा तीन दिवस वाढीव कोठडीची मुदत २० जुलै रोजी संपली. याच तीन दिवसांच्या काळात १६ व्या मीनानाथ चव्हाण या आरोपीकडून घोटी, इगतपुरी येथून पाच लाख ७९ हजारांची रोकड हस्तगत केली. वरील चौघांच्याही पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना बुधवारी ठाणे न्यायालयाने १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्यामुळे त्यांची रवानगी आता ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. वैभवसह चौघांकडून प्रत्येकी ६० लाख अशी दोन कोटी ४० लाखांची त्यांच्या वाट्याला आलेली संपूर्ण रोकड हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.