शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात पोटनिवडणुकीत ३५ टक्के मतदान

By admin | Updated: January 19, 2015 04:37 IST

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील वागळे इस्टेटमधील ३ आणि मुंब्य्रातील २ अशा ४ प्रभागांकरिता रविवारी झालेल्या पोटनिवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले

ठाणे : ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील वागळे इस्टेटमधील ३ आणि मुंब्य्रातील २ अशा ४ प्रभागांकरिता रविवारी झालेल्या पोटनिवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले. या पाचही ठिकाणी सुमारे ३५ ते ४० इतके टक्के मतदान झाले. रविवार असूनही प्रामुख्याने मुंब्रा परिसरात मतदारराजाने पाठ फिरवल्याचे दिसून आले. ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक - १३ अ मध्ये काँगे्रसच्या नगरसेविका कांचन चिंदरकर, तर ३४ अ व ब या ठिकाणच्या नगरसेविका जयश्री फाटक व नगरसेवक रवींद्र फाटक यांनी काँग्रेस नगरसेवकपदाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला होता. ६१ अ मधील अब्दुल रौफ लाल व ६३ अ च्या रजिया शेख यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने या ५ ठिकाणी पोटनिवडणुकीचे आज मतदान घेण्यात आले. वागळे इस्टेट परिसरात शिवसेनेच्या चिंदरकर यांच्याविरोधात काँग्रेसच्या शीतल चव्हाण आणि फाटक दाम्पत्याविरोधात काँग्रेसकडून डॉ. अभिजित पांचाळ व ललिता टाकळकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी साजीद मोहम्मद युसुफ आणि हसीना अब्दुल आजीस शेख यांना उमेदवारी दिली होती. तर समाजवादी पक्षाने अन्सारी मोहम्मद अनिस आणि शहापरा अस्फाक अली यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.वागळे व किसननगर भागात तीन पोटनिवडणुकांत शिवसेना विरु द्ध काँगे्रस तर मुंब्य्रात राष्ट्रवादी काँगे्रस विरोधात समाजवादी पार्टी अशी लढत झाली. रविवारी सकाळी मतदारांचा अल्प प्रतिसाद दिसून आला. या पाचही ठिकाणी दुपारी साडेतीनपर्यंत केवळ २६ टक्के मतदान झाले होते. मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. प्रभाग क्रमांक १३ अ मध्ये अंदाजे ४२ ते ४३, ३४ अ आणि ब येथे ५३ ते ५४ तसेच ६१ अ मध्ये २० ते २१ इतके मतदान झाले आहे. सोमवारी दादोजी कोंडदेव स्टेडिअममध्ये मतमोजणी होणार आहे. त्यानंतरच आपापले बालेकिल्ले राखण्यामध्ये कोण यशस्वी ठरणार, हे स्पष्ट होईल. (प्रतिनिधी)