शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील वर्तकनगर रंगलेय चित्रीकरणात....

By admin | Updated: May 21, 2016 03:39 IST

बोल बजरंग बली की जय... आला रे आला गोविंदा आला... अशा आरोळया देत भर उन्हात दहीहंडीला गोविंदा पथकांची सलामी...

जितेंद्र कालेकर,

ठाणे- बोल बजरंग बली की जय... आला रे आला गोविंदा आला... अशा आरोळया देत भर उन्हात दहीहंडीला गोविंदा पथकांची सलामी... तरुणांबरोबर तरुणींचेही गोविंदा पथक घोळक्या घोळक्याने बाईकवरुन येतांनाचे चित्र सध्या पहायला मिळतेय... ठाण्याच्या वर्तकनगगर भागातील महापालिका शाळेच्या मैदानासमोर...एरव्ही जुलै किंवा आॅगस्ट मध्ये साजरी होणारी दहीहंडी अर्थात गोपाळकाला वर्तकनगरमध्ये बुधवारी मोठया जल्लोषात सुरु होती. तोच उत्साह. तोच जल्लोष आणि ढोल ताशांच्या दणदणाटात दहीहंडी फोडणाऱ्या अवधूत गुप्ते दिग्दर्शित आणि विहंग प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या मराठी चित्रपटाचे बहुतांश चित्रिकरण हे वर्तकनगरच्या पोलीस वसाहतीमध्ये दिवसा आणि रात्रीच्या वेळी चित्रीत झाले आहे. गेल्या दोन आठवडयांपासून हे चित्रीकरण सुरु आहे. आणखी दोन दिवस चालणाऱ्याया चित्रीकरणातील महत्वाच्या टप्पाचा भाग बुधवारी चित्रीत झाला.गोविंदा पथकांमधील वाद, संघर्षावरील चित्रपटात गोविंदा पथके कसे एकावर एक चार ते पाच थर रचतात याचे चित्रीकरण आहे. वैभव तत्ववादी याच्यासह अनेक कलाकार मंडळींचा यामध्ये समावेश आहे. शूटींग थेट आपल्या घराच्या गॅलरीतून पहायला मिळत असल्यामुळे या भागातील तरुण तरुणींमध्ये वेगळाच उत्साह पहायला मिळत होता.काही स्थानिक तरुणांनाही दहीहंडीच्या ठिकाणी थर रचण्यासाठी काम मिळाल्यामुळे आपणही चित्रपटात दिसणार या कल्पनेने त्यांच्यातही वेगळाच सैराट जाणवत होता. >‘काहे दिया परदेस’मधील नायकसोबत सेल्फीकेवळ चित्रपटाचीच नव्हे तर सध्या एका वाहिनीवर गाजत असलेली ‘काहे दिया परदेस..’ या मालिकेचेही अधून मधून याच भागात चित्रिकरण टीएमटीच्या बस थांब्यावर करण्यात येत असते. त्यामुळे या मालिकेतील नायकाबरोबर सेल्फी घेण्यासाठीही अनेक तरुणी गर्दी करतानाचे चित्रही पहायला मिळते. ठाणे महापालिकेकडून कोणताही वेगळा कर न आकारता शूटींगसाठी सहज परवानगी मिळत असल्यामुळे सध्या वर्तकनगर भाग चित्रीकरणासाठी चांगलाच प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.यापूर्वीही झेडा, बालक पालक, शाळा, टाईमपास अशा अनेक मराठी चित्रपटांचे चित्रीकरण याच भागात झालेले आहे. एकीकडे चित्रीकरणासाठी महापालिकेकडून कोणताही महसूल घेतला जात नाही. अशा प्रकारचा महसूल जमा करण्याच्या दृष्टीने पालिका प्रस्ताव विचाराधीन आहे. अशा प्रकारे प्रस्ताव तयार झाला तर पालिकेला चित्रीकरणाच्या माध्यमातून करोडोंचे उत्पन्न मिळू शकणार असल्याची प्रतिक्रीया येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.