शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरेंचा आरोप म्हणजे वडाची साल पिंपळाला

By admin | Updated: May 17, 2017 02:24 IST

आघाडी सरकारच्या काळातील सिंचन घोटाळ्यांशी सध्याच्या जलयुक्त शिवार योजनेतील कथित घोटाळ्यांशी तुलना करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगतील त्या ‘जलयुक्त’

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आघाडी सरकारच्या काळातील सिंचन घोटाळ्यांशी सध्याच्या जलयुक्त शिवार योजनेतील कथित घोटाळ्यांशी तुलना करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगतील त्या ‘जलयुक्त’च्या कामाची चौकशी करण्याची आपली तयारी आहे असे आव्हान जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी आज दिले. ते पत्रकारांशी बोलत होते. ठाकरे यांचा आरोप तथ्यहिन असल्याचे सांगून ते म्हणाले, हा आरोप म्हणजे वडाची साल पिंपळाला लावण्ळाचा प्रकार आहे. त्यांनी वा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी ‘जलयुक्त’च्या कामांवर टीका करण्याआधी सरकार पारदर्शकपणे करीत असलेल्या कामांची माहिती घ्यायला हवी होती. शेवटी आम्ही सरकारमध्ये एकत्र आहोत. माझ्या खात्याचे राज्यमंत्रीही शिवसेनेचे आहेत, असे राम शिंदे म्हणाले. जलयुक्तमधील कामे जनता सुचवते, ग्रामसभा त्यांना अनुमती देते, कामे पूर्ण झाल्याचे ग्रामसभेने आणि त्रयस्थ एजन्सीने प्रमाणित केल्यानंतरच बिले अदा केली जातात. जलयुक्तमुळे कृषी उत्पन्नात वाढ झाली आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी जिल्ह्यातील कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करताना रामदास कदम यांनी सरकारला नव्हे तर स्थानिक पालकमंत्री रवींद्र वायकर यांना लक्ष्य बनविलेले दिसते, असा चिमटाही शिंदे यांनी काढला. मृद व जलसंधारण आयुक्तालय औरंगाबाद येथे १ मे पासून सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. त्यास थोडा विलंब झाला असला तरी आजच आपली या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झालेली आहे. या आयुक्तालयासाठी आयएएस दर्जाचा अधिकारी लवकरच दिला जाईल आणि हे आयुक्तालय सुरू होईल, असे शिंदे यांनी एका प्रश्नात स्पष्ट केले.