शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
2
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
3
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
4
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
5
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
6
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
7
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
8
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
9
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
10
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
12
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
13
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
14
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
15
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
16
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
17
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
18
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
19
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
20
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

महाराष्ट्राला ठेंगा, बिहारला देणार भरभरून!

By admin | Updated: September 28, 2015 02:23 IST

एकीकडे केंद्राच्या तिजोरीत पैसा नसल्याने महाराष्ट्रात पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे (पीएमजीएसवाय) काम पूर्णपणे ठप्प झाले असताना मोदी सरकारने विधानसभा निवडणुकांवर नजर ठेवून बिहारला

प्रमोद गवळी, नवी दिल्लीएकीकडे केंद्राच्या तिजोरीत पैसा नसल्याने महाराष्ट्रात पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे (पीएमजीएसवाय) काम पूर्णपणे ठप्प झाले असताना मोदी सरकारने विधानसभा निवडणुकांवर नजर ठेवून बिहारला याच योजनेंतर्गत २२८१ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण देशात वाटप करण्यात आलेला हा सर्वाधिक निधी असून यावरून केंद्राचा हेतू स्पष्ट होतो.महाराष्ट्राला या योजनेसाठी केंद्राकडून यावर्षी फक्त ३६६ कोटी रुपये मिळणार आहेत. आश्चर्य हे की, गेल्या तीन आर्थिक वर्षांदरम्यान विविध ठेकेदारांनी केलेल्या २१०० कोटी रुपयांच्या कामाचा मोबदला देण्याच्या दृष्टीने कुठलेही गांभीर्य दिसत नाही. भरीसभर म्हणजे राज्य सरकारनेही सर्व कामांची नोंद केलेली नाही. केवळ ६०० कोटी रुपयांच्या पावत्यांची यादी तयार केली आहे. अर्थात ठेकेदारांचे फक्त ६०० कोटी रुपये देणे असल्याचे सरकारला दाखवायचे आहे. आता आणखी नाही...दरम्यान पीएमजीएसवाय अंतर्गत काम करणारे अकोल्याचे ठेकेदार सुमित कोठारी, नागपूरचे अश्विन मेहता आणि जळगाव जिल्ह्यातील संजय पाटील यांनी सांगितले की, गेल्या दीड वर्षात आमचे शेकडो कोटी रुपये अडकले आहेत. विशेष म्हणजे पहिले पैसे मग काम, असा या योजनेचा नियम आहे. असे असतानाही आमचे १५०० कोटी रुपयांचे बिल बाकी आहे. या योजनेंतर्गत बिलाची रक्कम मिळण्यास यापूर्वी कधीही अडचण आली नव्हती. त्यामुळे आम्ही कामे पूर्ण केली. परंतु नवे सरकार आल्यापासून आमच्या समस्या वाढल्या आहेत. काम मध्येच बंद केले तर नियमानुसार आमच्यावर एकूण खर्चाच्या १० टक्के दंड आकारण्यात येतो. त्यामुळे कुणी काम थांबविले नव्हते. पण आता शक्य नाही.