शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे स्मारकाचे आज लोकार्पण

By admin | Updated: January 7, 2017 03:56 IST

काळातलाव येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा लोकार्पण कार्यक्रम आचारसंहितेच्या कचाट्यात सापडला

कल्याण : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने काळातलाव येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा लोकार्पण कार्यक्रम आचारसंहितेच्या कचाट्यात सापडला होता. परंतु, स्मारकाच्या लोकार्पणासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे ठरलेल्या दिवशी शनिवारी सायंकाळी ५ वाजता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या स्मारकाचे लोकार्पण होणार आहे. बाळासाहेबांच्या स्मारकाच्या लोकार्पणासाठी आधी ८ जानेवारीची तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवार, ७ जानेवारीची तारीख ठरवली. परंतु, बुधवारी सायंकाळीच कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली. त्यामुळे लोकार्पणाचा कार्यक्रम आचारसंहितेच्या कचाट्यात सापडला होता. त्यावर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता ही सार्वत्रिक निवडणुकीची नाही तसेच स्मारक लोकार्पण या कार्यक्रमाचा या निवडणुकीवर कोणताही प्रभाव पडणार नाही. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम पूर्वनियोजित सरकारी कार्यक्रम असल्यामुळे निवडणूक आयोगाने या कार्यक्रमाला विशेष परवानगी द्यावी, अशी मागणी गुरुवारी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. त्याची दखल घेत आयोगाने कार्यक्रमाला सशर्त परवानगी दिली. त्यामुळे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (प्रतिनिधी) ।महापौरांनी मानले आभारस्मारकाच्या लोकार्पणासाठी निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळावी, यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल महापौर राजेंद्र देवळेकर यांनी शिवसेनेचे खासदार व पक्षाचे सचिव अनिल देसाई आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर त्यांनी निवडणूक आयोगालाही धन्यवाद दिले आहेत. आयोगाच्या अटी : आयोगाने परवानगी देताना ती सशर्त दिली आहे. या कार्यक्रमात मतदारांवर प्रभाव पडेल, अशी कोणतीही घोषणा करू नये. राजकीय नेते आणि मंत्र्यांनीदेखील याची काळजी घ्यावी तसेच निवडणुकीशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांना या कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही, अशा अटी आयोगाने घातल्या आहेत.पुतळ्यालाही मिळाली परवानगीबाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ््याला गृहमंत्रालयानेही परवानगी दिली आहे. त्यासंबंधीचे पत्रही त्यांनी ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. मनसेने स्मारकाची पाहणी केली असताना पुतळ््याला परवानगी नसल्याची बाब उघडकीस आली होती. त्यावर केडीएमसीचे शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी दोन दिवसांत पुतळ््याला परवानगी मिळेल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पुतळ््याची पाहणी केली होती.