‘इंटरट्रेडिंग’ सुरू : बाळासाहेबांना दिलेला शब्द भाजपाकडून पायदळी
मुंबई : शिवसेना-भाजपाने परस्परांच्या पक्षातील बंडखोरांना प्रवेश देऊन ‘इंटरट्रेडिंग’ करायचे नाही, हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रमोद महाजन यांनी आपल्या हयातीत पाळलेला करार धाब्यावर बसवत भाजपाने सोमवारी नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील शेकडो शिवसैनिकांना पक्षात प्रवेश दिला.
प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत सुमारे 200 कार्यकत्र्याना भाजपात प्रवेश दिला गेला. निफाडमधील राजमुद्रा प्रतिष्ठानचे शरद नाठे, अनिल टर्ले, दत्तू शिंदे, योगेश भुसारी, बाळासाहेब गडाख आदींचा यामध्ये समावेश होता.
बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन यांनी परस्परांच्या पक्षातील असंतुष्टांना प्रवेश द्यायचा नाही, असा अलिखित करार केला होता. गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंग वाघेला हे जेव्हा भाजपामध्ये नाराज झाले व त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी शिवसेनाप्रमुखांची भेट घेऊन शिवसेना प्रवेशाची तयारी दर्शविली होती. मात्र लागलीच महाजन यांनी ठाकरे यांची भेट घेऊन ‘इंटरट्रेडिंग’ नको, अशी विनंती केली. त्यांनी हा करार आपल्या कारकिर्दीत कसोशीने पाळला होता.
च्लोकसभा निवडणुकीत धुळे मतदारसंघातील शिवसेनेच्या सुभाष भामरे यांना भाजपाने पक्षप्रवेश देऊन हा करार प्रथम धाब्यावर बसवला. भामरे यांना शिवसेनेने 2क्क्4 मध्ये उमेदवारी दिली होती.
च्2क्क्9 मध्ये खुद्द भामरे यांनी शिवसेनेच्या उमेदवारीला नकार दिला होता. भामरे हे एकेकाळी काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे भामरे हे तशा अर्थाने कट्टर शिवसैनिक नव्हते. मात्र आता थेट शिवसैनिकांना भाजपाने प्रवेश देऊन एकेकाळी बाळासाहेबांना दिलेला शब्द पायदळी तुडविला आहे.