शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘युवा’मुळे टळली ठाकरे बंधूंची भेट

By admin | Updated: August 10, 2015 01:30 IST

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होऊ घातलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘भरतभेट’ युवासेनेच्या

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होऊ घातलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘भरतभेट’ युवासेनेच्या ‘बाल’हट्टामुळे टळल्याची चर्चा आहे. मनसेसोबत कोणताही राजकीय समझोता करण्यास युवासैनिकांचा ठाम विरोध असल्याचे कळते. ठाकरे बंधूंच्या कथित भेटीचे वृत्त ‘व्हायरल’ होताच उद्धव यांनी भेटीबाबतच्या वृत्ताचा तातडीने इन्कार केला, मात्र मनसेकडून सोईस्कर मौन पाळले गेले.उद्धव व राज यांच्यातील राजकीय वैमनस्यामुळे खंडित झालेला संवाद विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने युती तोडल्यानंतर सुरू झाला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तिथीपूर्वी उभयतांची भेटही ठरली होती. ‘मातोश्री’वरून भेटीचा सांगावा येताच राज यांनी मनसे उमेदवारांचे एबी फॉर्म वाटप थांबविले होते. पण ऐनवेळी कुठेतरी माशी शिंकली आणि संभाव्य शिवसेना-मनसे युतीच्या शक्यतेवर पाणी पडले. टळलेल्या ‘त्या’ भेटीचे रहस्योद्घाटन स्वत: राज यांनीच नंतर माध्यमांसमोर केले होते.राज्यात सत्तांतर घडून भाजपा प्रणीत सरकार आल्यानंतर सगळेच राजकीय संदर्भ बदलले. रडतखडत शिवसेना सत्तेत सहभागी झाली, तरी भाजपाकडून मिळत असलेल्या सापत्न वागणुकीमुळे सेनेची अजूनही तळ्यात-मळ्यात भूमिका आहे. तर दुसरीकडे कोल्हापूर महापालिका निवडणुकीत सेनेसोबतची युती तोडून स्थानिक ताराराणी आघाडीसोबत निवडणूक लढवण्याची भाजपाने तयारी केली आहे. त्यामुळे उद्धव व राज एकत्र येऊन भाजपाचा मुकाबला करणार या चर्चेला जोर आला. त्यातूनच या दोघांची कर्जतमध्ये भेट झाल्याच्या चर्चेला ऊत आला. मात्र या कथित भेटीचा उद्धव यांनी ठामइन्कार केला आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, उद्धव व राज यांच्या भेटीचे वृत्त देऊन राजकीय गैरसमज पसरवून गोंधळ निर्माण केला जात आहे. मात्र अशी गुप्त भेट व राजकीय खलबते झालेली नाही. शिवसेना स्वतंत्र बाण्याचा पक्ष असून, गुप्त खलबते करण्यावर आमचा विश्वास नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महापालिका शाळांमध्ये टॅब वाटपाच्या आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेला मनसेने विरोध दर्शविला होता. त्यामुळे मनसेसोबत कोणताही राजकीय समझोता नको, अशी ठाम भूमिका युवासेनेकडून घेतली गेल्याचे कळते. (विशेष प्रतिनिधी)