शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

तीनशे रुपयांत बनावट आधारकार्ड

By admin | Updated: August 2, 2016 02:08 IST

बनावट कागदपत्रे तयार करुन या पुराव्याच्या आधारावर बनावट आधारकार्ड तयार करणाऱ्या तीन जणांना चेंबूर पोलिसांनी अटक केली.

मुंबई: बनावट कागदपत्रे तयार करुन या पुराव्याच्या आधारावर बनावट आधारकार्ड तयार करणाऱ्या तीन जणांना चेंबूर पोलिसांनी अटक केली. या आरोपींनी अशाच प्रकारे ५०० ते ६०० जणांना बनावट आधारकार्ड बनवून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.वाढत्या गुन्हेगारीसोबतच दहशदवादी कारवायांना आळा घालण्यासाठी काही वर्षांपूर्वी पोलीस ठाण्यांमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे. या पथकातील अधिकारी संशयास्पद व्यक्तींवर नजर ठेवून असतात. अशाच प्रकारे चेंबूर पोलीस ठाण्यातील काही अधिकारी चार दिवसांपूर्वी भक्ती पार्क परिसरातील सीम कार्ड मिळणाऱ्या दुकानात गेले होते. याठिकाणी काही ग्राहकांनी सीम कार्ड देण्यासाठी कागदपत्रे दिली होती. अधिकारी ही कागदपत्रे तपासत असताना त्यांना एक आधारकार्ड संशयास्पद वाटले. त्यांनी तत्काळ या आधारकार्डधारकाची विचारपूस केली असता, दुकानाच्या बाजूलाच असलेल्या एका सलूनमधील शब्बीर अल्ली (२३) तरुणाचे ते आधारकार्ड असल्याचे दुकानदाराने सांगितले. पोलिसांनी तत्काळ या तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, हे आधारकार्ड केवळ तीनशे रुपयात त्याला पंडित यादव (४४) या आरोपीने बनवून दिल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी नेहरु नगर परिसरातून पंडितला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याजवळ पोलिसांना एक डायरी देखील आढळून आली. त्यात त्याने आत्तापर्यंत अशाच प्रकारे ६०० जणांना बनावट आधारकार्ड बनवून दिल्याची नोंद आहे.पोलिसांनी या आरोपीला तत्काळ अटक करत त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता शांताराम चव्हाण (३८) हा आरोपी त्याला बनावट कागदपत्रे तयार करुन देत असल्याचे पोलिसांना त्याने सांगितले. ज्या इसमाला आधार कार्ड हवे आहे, अशा इसमाचे नाव तो कोणाचेही रेशनकार्ड घेऊन त्या झेरॉक्सवर लावत असे. त्यानंतर ही कागदपत्रे घेऊन तो आधार कार्डचे कंत्राट मिळालेल्या दप्तेश साळुंखे (२५) या आरोपीकडे जायचा. त्याला ठरलेली रक्कम दिल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी न करताच तत्काळ तो त्याला हे आधारकार्ड बनवून देत असे. चेंबूर पोलिसांनी यामध्ये या तिन्ही आरोपींना अटक केली आहे. तसेच पुरावे नसताना देखील आधारकार्ड बनवून घेणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती यावेळी झोन सहाचे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिली. (प्रतिनिधी)