शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओचे बनावट बॅज साठा जप्त

By admin | Updated: April 8, 2017 04:15 IST

आरटीओच्या बनावट बॅज, बिल्ल्यांचा साठा सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने मुंब्य्रातून जप्त केला असून, याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

ठाणे : आरटीओच्या बनावट बॅज, बिल्ल्यांचा साठा सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने मुंब्य्रातून जप्त केला असून, याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.बस, टॅक्सी तसेच रिक्षा चालक आणि वाहकांना आरटीओकडून दिल्या जाणाऱ्या बॅज, बिल्ल्यांच्या बोगस साठ्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार सोनसाखळी चोरी विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद पिंगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळवारी सापळा रचला. मुंब्य्रातील न्यू मुसाकासम इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरील एका रुममध्ये आरोपी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर मिलिंद पिंगळे यांच्या पथकाने धाड टाकली. त्यावेळी दोन आरोपी बनावट बॅज, बिल्ले तयार करताना रंगेहाथ सापडले. चौकशी केली असता त्यांच्याकडे या कामाचा कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. साजीद अबुबकर मांडवीवाला आणि मोहम्मद सलिम इब्राहिम भूजवाला यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ११३ बनावट बॅज जप्त करण्यात आले. याशिवाय बनावट बॅज तयार करण्यासाठी वापरले जाणारे सुमारे ४0 हजार रुपयांचे साहित्यही पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, न्यायालयाने आरोपींना १0 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी)६ महिन्यांपासून सुरु होता उद्योगआरोपींचा मूळ व्यवसाय नेमप्लेट तसेच वाहनांच्या नंबरप्लेट बनवण्याचा आहे. जवळपास ६ महिन्यांपासून ते बनावट बॅज, बिल्ले तयार करून विकण्याच्या गोरखधंद्यात उतरले. एक बॅज ते सुमारे २५0 ते ३00 रुपयांमध्ये विकायचे. आतापर्यंत १00 ते १५0 चालक, वाहकांना आरोपींना बनावट बॅज, बिल्ले विकल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. आरटीओकडून माहितीया प्रकरणाच्या सखोल तपासासाठी आरटीओकडून आवश्यक माहिती पोलीस घेणार आहेत. चालक, वाहकांना दिले जाणारे बॅज, बिल्ले कुठून बनवले जातात, ते बनविण्याचा कुणाला अधिकृत परवाना दिला आहे का, कुणाचा बॅज अथवा बिल्ला हरवल्यास तो बाहेरून दुसरा बनवू शकतो का, अशा अनेक मुद्यांची माहिती पोलीस आरटीओकडून घेणार आहे.