शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
12
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
14
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
15
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
16
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
17
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
18
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
19
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
20
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा

रेल्वेच्या परीक्षेकडे उमेदवारांची पाठ

By admin | Updated: December 1, 2014 00:49 IST

रेल्वे रिक्रूटमेंट सेलच्या वतीने नागपुरात घेण्यात आलेल्या ग्रुप डीच्या पदाच्या परीक्षेकडे उमेदवारांनी पाठ फिरविली असून तब्बल २१ हजार ४७२ उमेदवार गैरहजर राहिले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

२१ हजार गैरहजर : रेल्वेस्थानकाचा परिसर गर्दीने गजबजलानागपूर : रेल्वे रिक्रूटमेंट सेलच्या वतीने नागपुरात घेण्यात आलेल्या ग्रुप डीच्या पदाच्या परीक्षेकडे उमेदवारांनी पाठ फिरविली असून तब्बल २१ हजार ४७२ उमेदवार गैरहजर राहिले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.रेल्वे रिक्रूटमेंट सेलच्यावतीने ग्रुप डीच्या पदासाठी नागपूर शहरातील ५३ केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले. परीक्षेसाठी एकूण २९ हजार ९९१ उमेदवारांनी अर्ज केले होते. यातील फक्त ८ हजार ५१९ उमेदवारच परीक्षेसाठी हजर झाले. उर्वरीत २१ हजार ४७२ उमेदवारांनी परीक्षेकडे पाठ फिरविली. परीक्षेला उपस्थित उमेदवारांची टक्केवारी फक्त २८.४० एवढीच नोंदविण्यात आली आहे. परीक्षेसाठी शाळेचे एकूण १ हजार ५५१ शिक्षक, रेल्वेचे १ हजार ५८ कर्मचारी आणि ७० अधिकारी उपस्थित होते. रेल्वे सुरक्षा दलाच्या ९५ जवानांनी चोख बंदोबस्त ठेऊन ही परीक्षा सुरळीत पार पाडली. दरम्यान चौथ्या टप्प्यातही उमेदवारांनी अल्पशी हजेरी लावल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.सून रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाच्या वतीने परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात आल्यानंतर तातडीने परीक्षा घेण्यात येत नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान दुपारी १२.३० वाजता परीक्षा आटोपल्यानंतर उमेदवारांमुळे रेल्वेस्थानक गजबजून गेला होता. (प्रतिनिधी)