शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीपूर्वीच संपली पीक विमा योजनेची मुदत

By admin | Updated: June 30, 2014 00:38 IST

पावसाच्या दडीने शेतकरी हैराण आहे. एकूण लागवड क्षेत्रापैकी केवळ २० टक्के क्षेत्रातच पेरणी झाली. या स्थितीत पिकांना संरक्षणासाठी हवामानावर आधारित पीक विमा योजना जाहीर करण्यात आली.

रूपेश उत्तरवार - यवतमाळ पावसाच्या दडीने शेतकरी हैराण आहे. एकूण लागवड क्षेत्रापैकी केवळ २० टक्के क्षेत्रातच पेरणी झाली. या स्थितीत पिकांना संरक्षणासाठी हवामानावर आधारित पीक विमा योजना जाहीर करण्यात आली. यासाठी अंतिम मुदत ३० जून आहे. मात्र पाऊस झाला नसल्याने पेरण्याही खोळंबल्या. अशा स्थितीत पीक विम्याची मुदत संपली आहे. नाममात्र लोकांनाच या योजनेचा लाभ घेतला.निसर्गाचा लहरीपणा, पावसाचा विलंब यामुळे शेतमालाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी हवामानावर आधारित पीक विमा जाहीर करण्यात आला. राज्यात प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविण्यात आली. अमरावती विभागात यवतमाळ आणि अमरावती या दोन जिल्ह्यासाठीच ही योजना लागू करण्यात आली. याशिवाय इतर पाचही विभागात प्रायोगिक तत्वावर असलेल्या या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ३० जून ही अंतिम मुदत आहे. पेरण्या खोळंबल्याने शेतकऱ्यांना पीक विमा काढता आला नाही. एका महत्वाकांक्षी योजनेला शेतकऱ्यांना मुकावे लागणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत नऊ लाख हेक्टरपैैकी १ लाख २० हजार हेक्टरवर पेरण्या व्हायच्या आहे. पश्चिम विदर्भात ४० लाख हेक्टरवर शेतकऱ्यांना पेरणी करता आली नाही. पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी अनेक ठिकाणी बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. यातूनच आजपर्यंत पिका विमा काढण्यासाठी शेतकरी पुढे आले नाही. शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र झालेले पेरणी क्षेत्र पटवाऱ्यांना माहीत नाही. यातून पटवारी पेरणीचे प्रमाणपत्र द्यायला तयार नाही. या योजनेचा प्रसारही पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही. त्यामुळे शेतकरी पीक विमा काढण्यापासून वंचित राहिल्याचे सांगितले जाते. निसर्गाच्या लहरीपणापासून शेतकऱ्यांना पीक विम्याचे संरक्षण देण्यात आले. त्यामुुळे शेतकऱ्यांना आशेचा किरण गवसला होता. प्रत्यक्षात पेरणीपूर्वीच मुदत संपल्याने शेतकऱ्यांना जबर फटका बसणार आहे. यातून असुरक्षिततेची भावना वाढीस लागून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढण्याची भीती आहे.