शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

साताऱ्याजवळ सापडली दहाव्या शतकातील मराठी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2015 00:38 IST

गायवासरू अन् ‘गधेगाळ’ एकाच शिलालेखावर

राजीव मुळ्ये - सातारा --मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी ग्राह्य लिखित पुरावा ठरलेल्या अक्षी-अलिबाग येथील शिलालेखासारखाच दुसरा शिलालेख साताऱ्यापासून पंधरा किलोमीटरवरील कोरेगावात सापडला असून, त्यावरील संस्कृतमिश्रित मराठी अक्षीच्या समकालीन असू शकते, असा अंदाज आहे. गायवासरू आणि ‘गधेगाळ’ ही दोन चिन्हे एकाच शिलालेखावर आढळण्याची ही देशातील पहिलीच घटना ठरल्याने या ऐतिहासिक ठेव्याचे मूल्य शतगुणित झाले आहे.साताऱ्याच्या जिज्ञासा इतिहास संशोधन संस्थेच्या सदस्यांनी प्रदीर्घ संशोधनानंतर हे यश मिळविले असून, कोरेगावच्या केदारेश्वर मंदिराच्या परिसरात प्राचीन इतिहास दडला असल्याची खात्री संस्थेच्या सदस्यांना झाली होती. तीळगंगा नदीच्या काठावर हे मंदिर असून, त्याचे बांधकाम आणि जीर्णोद्धार अनेक टप्प्यांत झाला असावा हे त्याच्या स्थापत्यशैलीवरून लक्षात येते. याच ठिकाणचा एक शिलालेख निम्म्याहून अधिक जमिनीखाली गाडला गेला आहे, हे ‘जिज्ञासा’चे विक्रांत मंडपे, नीलेश पंडित, सागर गायकवाड, योगेश चौकवाले, धैर्यशील पवार, शीतल दीक्षित यांना आढळून आले. श्री केदारेश्वर ट्रस्टच्या सहकार्याने या मंडळींनी गाडलेला भाग मोकळा केला. हा शिलालेख एकूण तेरा ओळींचा असून, देवनागरी आहे. यातील ‘ज’ या अक्षराचे वळण दहाव्या शतकातील आहे. ही संस्कृतमिश्रित मराठी असण्याची शक्यता असून, या शिलालेखाचे वाचन व अभ्यास करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मराठी ही अभिजात भाषा असल्याचे दाखवून देणारा सर्वांत जुना शिलालेख अक्षी-अलिबाग येथे आढळला असून, त्यावरही ‘गधेगाळ’ हे चिन्ह आहे. ते शापवाणीचे निदर्शक असून, ते शिलाहारकालीन चिन्ह आहे. कोरेगावातील शिलालेखाच्या तळातही अशाच प्रकारची ‘गधेगाळ’ सापडली असून, येथील अवशेषही शिलाहारकालीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, शिलालेखाच्या वरच्या बाजूला गायवासरू हे चिन्ह असून, तळाला ‘गधेगाळ’ चिन्ह आहे. ही चिन्हे एकाच शिळेवर आतापर्यंत कधीच सापडली नव्हती. त्या दृष्टीने या अनमोल ठेव्याचे जतन आणि त्यावर संशोधन व्हावे, अशी ‘जिज्ञासा’ची अपेक्षा आहे.सौम्य-प्रखर चिन्हे एकत्रज्येष्ठ इतिहासकार वि. वा. मिराशी यांच्या मते, गाय ही जमिनीचे, तर वासरू हे भोगवटादाराचे प्रतीक आहे. दूध म्हणजे जमिनीचे उत्पन्न. जमीन देवस्थानला दान केली आहे. त्यावर अतिक्रमण होऊ नये, असा या चिन्हाचा अर्थ असून, हे सौम्य चिन्ह मानले जाते. तथापि, अतिक्रमणाची शक्यता अधिक असल्यास ‘गधेगाळ’ किंवा ‘गद्धेगाळ’ हे प्रखर चिन्ह वापरले जात असे. ‘गाळ’ हा मूळ कन्नड शब्द असून, त्याचा अर्थ शिळा किंवा पट असा आहे. अतिक्रमण करणाऱ्याला गाढवाचा जन्म मिळेल आणि तो आपल्या आईशी रत होईल, अशी ही शापवाणी आहे. गायवासरू आणि ‘गधेगाळ’ एकाच शिलालेखावर आढळल्याने संशोधकांच्या भुवया उंचावणार आहेत.कोरेगाव येथील शिलालेखावर सौम्य आणि प्रखर अशी दोन राजाज्ञेची चिन्हे एकत्रित आढळली आहेत.देशातील पहिलीच घटनागायवासरू आणि ‘गधेगाळ’ ही दोन चिन्हे एकाच शिलालेखावर आढळण्याची ही देशातील पहिलीच घटना ठरली आहे.या संशोधनामुळे प्राचीन समाजरचना, कायद्यांची रचना आणि सामाजिक उलथापालथीचे आकलन होणार आहे. समकालीन शिलालेख अनेक कारणांनी वाचता येत नाहीत. त्या तुलनेत कोरेगावचा शिलालेख वाचता येण्याजोगा असून, राजाज्ञेचे एक चिन्ह असताना दुसरे का कोरले गेले, याचा अभ्यास केल्यास दहाव्या शतकातील घडामोडींवर प्रकाश पडू शकेल.- नीलेश पंडित, इतिहास अभ्यासक