शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

तेरणा विद्यालय व्यवस्थापनाची मनमानी

By admin | Updated: June 28, 2016 02:24 IST

नेरुळमधील तेरणा विद्यालयाच्या व्यवस्थापनाने भरमसाट फीवाढ केली आहे.

नवी मुंबई : नेरुळमधील तेरणा विद्यालयाच्या व्यवस्थापनाने भरमसाट फीवाढ केली आहे. शालेय वस्तूंसाठीचे शुल्क वाढविले आहे. इमारत दुरुस्तीचे कामही रखडल्यामुळे पालकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शासनाच्या सूचनेप्रमाणे शहरातील सर्व शाळा १५ जूनला सुरू झाल्या आहेत. परंतु नेरूळमधील तेरणा शाळेच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने २६ जूनपर्यंत शाळा बंद होती. व्यवस्थापनाने दोन महिन्यांपूर्वी पालकसभा घेवून पुढील शैक्षणिक वर्षात गणवेश, बॅग व इतर शैक्षणिक साहित्य शाळा देणार असून त्यासाठी २५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याचे सांगितले होते. पालकांनी पैसे जमा केले परंतु गत आठवड्यात इ. निहाय १४०० चे २६०० रुपये जादा द्यावे लागणार असल्याचे सांगितले. याशिवाय अचानक फीवाढही केली. यामुळे पालकांमध्ये व्यवस्थापनामुळे स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. शाळा सुरू होत नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होवू लागले आहे. अचानक केलेल्या फीवाढीचा भुर्दंडही पडला आहे. नागरिकांमधील नाराजी वाढल्याने २७ जूनला शाळा सुरू करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सूरज पाटील, गिरीष म्हात्रे, महादेव पवार यांनी व्यवस्थापनाची भेट घेवून फीवाढ कमी करण्याची मागणी केली आहे. शैक्षणिक साहित्याचे वाढविलेले दर कमी करण्याचीही मागणी केली आहे. व्यवस्थापनाने याविषयी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. व्यवस्थापन पालकांवरील भुर्दंड कमी करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. >राष्ट्रवादीने घेतली धावतेरणा व्यवस्थापनाने केलेल्या फीवाढीचा व गणवेशाचे दर वाढविण्याची दखल राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. नगरसेवक सूरज पाटील यांनी फीवाढ कमी करण्याची मागणी केली आहे. व्यवस्थापनाने आठ दिवसांमध्ये फीवाढ कमी करण्याचे आश्वासन दिले आहे.>शिवसेना देणार आज निवेदनफीवाढीचा विरोध करण्यासाठी शिवसेना मंगळवारी तेरणा विद्यालयावर धडक देणार आहे. व्यवस्थापनाला जाब विचारण्यात येणार आहे. फीवाढ थांबविली नाही तर तीव्र आंदोलन सुरू केले जाणार आहे.