शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जामोद येथे तणाव, पोलिसांचा हवेत गोळीबार!

By admin | Updated: April 17, 2016 01:12 IST

बुलडाणा जिल्ह्यातील घटना; तुफान दगडफेकीत दोन जण गंभीर जखमी.

जामोद (जि. बुलडाणा) : महाप्रसादासाठी भाकरी गोळा करीत फिरत असलेला ट्रॅक्टर अडविल्यामुळे जातीय तणाव निर्माण होऊन, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागल्याची घटना शनिवारी रात्री येथे घडली. दगडफेकीत ९ जण जखमी झाले असून यापैकी दोन जण गंभीर आहेत. दरम्यान, गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.जामोद येथील माळी खेल भागातील श्रीराम मंदिरात राम नवमीचा उत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा केला जातो. पहिल्या दिवशी रथाची मिरवणूक काढण्यात येते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी राम मंदिरात ३0 पोत्यांचा महाप्रसाद वितरित केला जातो. यासाठी गावामध्ये भाकरी तयार करण्यासाठी महिलांना घरोघरी ज्वारीचे पीठ दिल्या जाते. तयार झालेल्या भाकरी ट्रॅक्टरद्वारे जमा करण्यात येता त. महाप्रसादासाठी एकत्रित केल्या जात असलेल्या भाकरीचा ट्रॅक्टर शिवापुरा भागात ९.३0 वाज ताच्या सुमारास एका समुदायाच्या लोकांनी अडविला. यावेळी बाचाबाची होऊन प्रकरण वाढले. या घटनेची माहिती गावात पसरल्यानंतर मुख्य चौक असलेल्या सुभाष चौकातील पानटपर्‍यांची जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली. सुभाष चौकाप्रमाणेच गावातील बेंबळेश्‍वर महादेव मंदिरावरही दगडफेक करुन मूर्तींची तोडफोड करण्यात आली. या ऐतिहासिक मंदिराची भिंत सुरुंग लावून उडविण्यात आली. तर एका प्रार्थनास्थळाची जाळपोळ करण्यात आली. याशिवाय अनेक भागात जाळपोळ करण्यात आल्याचे वृत्त आहे. दगडफेकीत हरिभाऊ ढगे आणि नंदकिशोर दलाल हे गंभीर जखमी झाले. तर इतर नऊ ते दहा जण किरकोळ जखमी झाले. या घटनेमुळे प्रसादासाठी पंगतीमध्ये बसलेल्या पुरुष व महिलांमध्ये प्रचंड गोंधळ व पळापळ झाली. या घटनेमुळे गावात प्रचंड तणाव निर्माण झाला असून पोलीस परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत.