शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर भवन पाडल्याने तणाव

By admin | Updated: June 26, 2016 04:25 IST

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दादर येथील जुनी ऐतिहासिक प्रिटिंग प्रेस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पाडण्यावरून शनिवारी दोन गटांत मोठा वाद निर्माण झाला.

मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दादर येथील जुनी ऐतिहासिक प्रिटिंग प्रेस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पाडण्यावरून शनिवारी दोन गटांत मोठा वाद निर्माण झाला. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या भवनाची मालकी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रस्टने पुनर्विकासासाठी पाडकाम केल्याचे सांगितले आहे. मात्र त्याला आंबेडकर कुटुंबीय व नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. आंबेडकर कुटुंबीयांकडून आलेल्या तक्रारीनुसार याबाबत भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणताही वाद उद्भवू नये, यासाठी आंबेडकर भवनाच्या परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि पीपल्स इम्प्रूव्हमेंट या ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्टची दादर पूर्वेकडील गोकूळदास पास्ता लेन परिसरातील डॉ. आंबेडकर भवन ही इमारत धोकादायक असल्याचे पालिकेने जाहीर केले. १ जून रोजी याबाबत नोटीसही बजाविण्यात आली. भवनातील सर्व बांधकामे नोटीस प्राप्त होताच ३० दिवसांच्या आत निष्कासित करणे संस्थेला बंधनकारक होते. शनिवारी पहाटे ३च्या सुमारास आंबेडकरी जनतेला थांगपत्ता लागू नये म्हणून या भवनावर बुलडोझर चढविण्यात आला. या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यासाठी जुनी इमारत पाडण्यात आल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले. शुक्रवारी रात्री बुलडोझर लावून येथे पाडकाम करण्यात आले. ही माहिती समजताच काही वेळातच घटनास्थळी समाजातील मंडळी मोठ्या संख्येने जमली. त्यांनी पाडकामाला विरोध दर्शवित संस्थेचा निषेध केला. घोषणाबाजीमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त तरुणांनी निषेधार्थ परिसरात तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. याबाबत भोईवाडा पोलीस ठाण्यात पाडकामाने भावना दुखावल्याचे सांगत तक्रार नोंदविण्यात आली.दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू व भारिपचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांनी दादरमध्ये परिसराला भेट देऊन घटनेचा निषेध केला आहे. (प्रतिनिधी)